राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख, सचिन वाझे, संजीव पलांडे आणि कुंदन शिंदे यांचा चौकशीसाठीचा ताबा सीबीआयकडे देण्यात आला. दरम्यान, १०० कोटी रुपये खंडणी प्रकरणी सीबीआयने मोठी कारवाई केली आहे. सीबीआयने सचिन वाझे, संजय पालांडे, कुंदन शिंदेंना अटक केली आहे. तर अनिल देशमुख रुग्णालयात दाखल झाल्यामुळे त्यांची अटक टळली आहे.
१०० कोटी रुपये खंडणी प्रकरणी सीबीआयने सचिन वाझे, संजय पलांडे, कुंदन शिंदे यांना अटक केली आहे. तर अनिल देशमुख यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्यामुळे त्यांच्यावर अटकेची कारवाई झालेली नाही.
न्यायालयीन कोठडीत असलेल्या अनिल देशमुख, सचिन वाझे, संजय पलांडे, कुंदन शिंदे यांच्या पुढील चौकशीचा ताबा घेण्यासाठी सीबीआयतर्फे मुंबई सत्र न्यायालयात अर्ज करण्यात आला होता. यावर सुनावणी पार पडली असून न्यायालयाने सीबीआयचा अर्ज स्वीकारला आहे. त्यानुसार आज सीबीआयने कारवाई केली असून सचिन वाझे, संजय पलांडे, कुंदन शिंदे यांना अटक केली आहे.
आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी तुरुंगात असलेले राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांना मुंबईमधील जे. जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कारागृहात असताना अनिल देशमुखांच्या खांद्याला मार लागला. त्यामुळे खांद्याच्या दुखापतीमुळे त्यांना उपचारासाठी जे.जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले असून लवकरच त्यांची शस्त्रक्रिया होणार आहे.