केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज लोकसभेत अर्थसंकल्प मांडला. मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील हा पहिलाच अर्थसंकल्प होता.
या अर्थसंकल्पात अनेक मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. मनसेकडून या अर्थसंकल्पाचं स्वागत करण्यात आलं आहे.
मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी मनसेतर्फे या अर्थसंकल्पाचं स्वागत केलं आहे. तसंच मनसेने केलेल्या मागण्या मान्य केल्याने अर्थमंत्र्यांचे जाहीर आभार मनसेने मानले आहेत.
मनसेने शुक्रवारी अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर, अर्थमंत्र्यांनी ठेवींवरील विमा संरक्षण १ लाखांवरुन ५ लाख करावं.
तसंच आयकर कमी करुन ज्या प्रमाणे उद्योगधंद्यांना दिलासा दिला, त्याच प्रकारे मध्यमवर्गीयांना दिलासा देण्याची मागणी फेसबुकद्वारे मनसेने केली होती.
मनसेने केलेली मागणी मोदी सरकारने पूर्ण केल्याने मनसेने आभार मानले आहेत.
मनसेने केलेली मागणी मान्य केल्याने बॅंकेतील ठेवीदारांना आणि मध्यमवर्गीयांना दिलासा मिळेल. सरकारचा हा स्तुत्य निर्णय आहे.
या निर्णयाचं आम्ही मनपासून स्वागत करतो, अशी भावना बाळा नांदगावकर यांनी ट्विटद्वारे व्यक्त केली. तसेच मनसेच्या अधिकृत खात्यावरुन एक व्हिडिओही शेअर करण्यात आला आहे.