BMC Doctors Strike: 5 ऑगस्टपासून BMC रुग्णालयांतील OPD सेवा बंद; निवासी डॉक्टरांचा संप

CCMP पात्रता असलेल्या BHMS डॉक्टरांना महाराष्ट्र वैद्यकीय परिषद (MMC) नोंदणी देण्याच्या प्रस्तावाविरोधात हे आंदोलन करण्यात येणार आहे.

BMC Doctors Strike:  5 ऑगस्टपासून BMC रुग्णालयांतील OPD सेवा बंद; निवासी डॉक्टरांचा संप

मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) प्रमुख रुग्णालयांमधील निवासी डॉक्टरांनी 5 ऑगस्टपासून नियमित बाह्यरुग्ण विभाग (OPD) सेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. KEM, सायन, नायर आणि कूपर रुग्णालयांतील निवासी डॉक्टर संघटना (BMC MARD) यांनी हा निर्णय जाहीर केला असून, CCMP पात्रता असलेल्या BHMS डॉक्टरांना महाराष्ट्र वैद्यकीय परिषद (MMC) नोंदणी देण्याच्या प्रस्तावाविरोधात हे आंदोलन करण्यात येणार आहे.

निवासी डॉक्टरांनी स्पष्ट केले आहे की, त्यांचा विरोध कोणत्याही वैद्यकीय पद्धतीला नसून 'क्रॉसपॅथी'ला आहे. BHMS डॉक्टरांना MMC नोंदणी देण्याचा निर्णय झाल्यास वैद्यकीय शिक्षणाची गुणवत्ता, उपचारांचे मानदंड आणि रुग्णांच्या सुरक्षिततेवर गंभीर परिणाम होऊ शकतो, असा दावा त्यांनी केला आहे. याशिवाय, निवासी डॉक्टरांच्या अनेक प्रलंबित प्रश्नांकडे सरकारकडून सातत्याने दुर्लक्ष होत असल्याचाही आरोप BMC MARD ने केला आहे. या पार्श्वभूमीवर सरकारने तातडीने चर्चा करून प्रश्न सोडवावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.

हेही वाचा – Maharashtra Cabinet Meeting Decision: महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे 7 महत्त्वाचे धडाकेबाज निर्णय; शेतकरी, न्यायव्यवस्था आणि ऊर्जा क्षेत्राला मोठा दिलासा 

BMC MARD च्या प्रमुख मागण्या
उच्च न्यायालयाचा अंतिम निकाल लागेपर्यंत BHMS डॉक्टरांची MMC नोंदणी प्रक्रिया स्थगित ठेवावी.
निवासी डॉक्टरांच्या प्रलंबित प्रश्नांवर तातडीने चर्चा करून निर्णय घ्यावा.
वैद्यकीय शिक्षणाची गुणवत्ता आणि रुग्ण सुरक्षेचे निकष कायम ठेवावेत.
अत्यावश्यक सेवा सुरूच राहणार

निवासी डॉक्टरांनी स्पष्ट केले आहे की, 5 ऑगस्टपासून नियमित OPD सेवा बंद राहतील, मात्र रुग्णांची गैरसोय होऊ नये म्हणून आपत्कालीन सेवा, ICU, कॅज्युअल्टी, प्रसूती कक्ष तसेच इतर अत्यावश्यक सेवा पूर्ववत सुरू राहतील.

आंदोलन तीव्र करण्याचा इशारा

सरकारने या मागण्यांची दखल घेतली नाही, तर येत्या काळात आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल, असा इशारा BMC MARD ने दिला आहे. या आंदोलनामुळे मुंबईतील हजारो रुग्णांच्या नियमित OPD सेवांवर परिणाम होण्याची शक्यता आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number