नागपूर मनपा पोटनिवडणुकीत भाजपचा काँग्रेसवर विजय

नागपूर महानगरपालिका पोटनिवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे उमेदवार विक्रम ग्वालबंशी प्रचंड मताधिक्याने विजयी झाले. काँग्रेस उमेदवार पंकज शुक्लासह सर्वच उमेदवारांचं डिपॉझिट जप्त झालं आहे. भाजपचे (BJP) नगर सेवक जगदीश ग्वालबंशी यांच्या अकाली निधनामुळे नागपूर महानगर पालिकेच्या प्रभाग क्रमांक 12(ड) साठी पोट निवडणूक घेण्यात आली. यात भाजपने निधन पावलेल्या जगदीश ग्वालवंशी यांचा मुलगा विक्रम ग्वालवंशी यांना उमेदवारी दिली.काँग्रेसकडून  […]

नागपूर मनपा पोटनिवडणुकीत भाजपचा काँग्रेसवर विजय

नागपूर महानगरपालिका पोटनिवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे उमेदवार विक्रम ग्वालबंशी प्रचंड मताधिक्याने विजयी झाले. काँग्रेस उमेदवार पंकज शुक्लासह सर्वच उमेदवारांचं डिपॉझिट जप्त झालं आहे.

भाजपचे (BJP) नगर सेवक जगदीश ग्वालबंशी यांच्या अकाली निधनामुळे नागपूर महानगर पालिकेच्या प्रभाग क्रमांक 12(ड) साठी पोट निवडणूक घेण्यात आली.

यात भाजपने निधन पावलेल्या जगदीश ग्वालवंशी यांचा मुलगा विक्रम ग्वालवंशी यांना उमेदवारी दिली.
काँग्रेसकडून  माजी नगरसेवक सुरेंद्र शुक्ला यांचा मुलगा पंकज शुक्ला यांना उमेदवारी दिली होती.

भाजप उमेदवार विक्रम ग्वालबंशी यांना मिळालेली मतं- 13,386

काँग्रेस उमेदवार पंकज शुक्ला यांना मिळालेली मतं- 3750

विक्रम ग्वालबंशी 9,336 मतांनी विजय मिळवला आहे.

याच निवडणुकीच्या एक दिवस आधी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचे निकाल जाहीर झाले, त्यात भाजपचा दारुण पराभव झाला होता. त्यामुळे नागपूरसह राज्याचे लक्ष या निवडणुकीकडे लागलं होते.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number