… तर एकच शिवजयंती झालीच पाहिजे -नितेश राणे

छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती तिथी आणि तारखेनुसार साजरी केली जाते. या तिथी आणि तारखेवरुन अनेक मतमंतातर आहेत. भाजप आमदार नितेश राणे यांनी  शिवाजी महाराजांची एकच जयंती झाली पाहिजे, अशी मागणी केली आहे. त्यांनी ट्विटद्वारे ही मागणी केली आहे. काय म्हणाले नितेश राणे ? राष्ट्रवादी काँग्रेस हा सत्ताधारी पक्ष आहे. राष्ट्रवादीची सत्ता आहे. तर मग एकच […]

… तर एकच शिवजयंती झालीच पाहिजे -नितेश राणे

छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती तिथी आणि तारखेनुसार साजरी केली जाते. या तिथी आणि तारखेवरुन अनेक मतमंतातर आहेत. भाजप आमदार नितेश राणे यांनी  शिवाजी महाराजांची एकच जयंती झाली पाहिजे, अशी मागणी केली आहे. त्यांनी ट्विटद्वारे ही मागणी केली आहे.

काय म्हणाले नितेश राणे ?

राष्ट्रवादी काँग्रेस हा सत्ताधारी पक्ष आहे. राष्ट्रवादीची सत्ता आहे. तर मग एकच शिव जयंती झालीच पाहिजे. तसेच शिव जयंती बाबत असलेला वाद मोडून टाकायला हवा, असंही नितेश राणेंनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

मी शिवप्रेमी म्हणून तुमच्या बरोबर असल्याचंही नितेश राणे म्हणाले आहेत. हीच ती वेळ, जय शिवराय.

दरम्यान याबाबतीत मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादीकडून मुख्यमंत्र्यांना आवाहन करण्यात आले आहे. तिथीचा हट्ट सोडून १९ फेब्रुवारी हीच शिवजयंतीची तारीख जाहीर करण्यात यावी, असे आवाहन राष्ट्रवादीकडून अमोल मिटकरी यांनी मुख्यमंत्र्यांना केलं आहे.

याबाबतीत राष्ट्रवादीच्या अमोल मिटकरी यांनी मुख्यमंत्र्यांना ट्विटद्वारे आवाहन केलं आहे.

https://twitter.com/amolmitkari22/status/1223892403670548480

शिवसेनेच्या वतीने नेहमी शिवजयंती ही तिथीप्रमाणे साजरी केली जाते. परंतु मित्रपक्षाने केलेल्या आवाहनामुळे शिवसेना नक्की काय भूमिका घेते, हे पाहावं लागणार आहे.   

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number