देवेंद्र फडणवीस यांच्या काळात महाराष्ट्रातील सर्वात मोठा घोटाळा झाला असल्याचा आरोप शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला आहे. महाआयटीमध्ये २५ हजार कोटी रुपयांचा घोटाळा झाला असल्याचा आरोप राऊतांनी केला आहे. माझ्या ५ हजार कोटींच्या घोटाळ्याची माहिती असल्याचे राऊत म्हणाले.
गुजरातमध्ये २५ हजार कोटींचा बँक घोटाळा झाला आहे. मात्र ईडी या घोटाळ्याचा तपास का करत नाही, तसेच हरियाणामध्ये दूधवाला ७ हजार कोटींचा मालक कसा झाला? असा सवालही संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे. तर ५० गुंठे जमिनीचा तपास ईडी करत असल्याचेेही ते म्हणाले.
पीएमसी बँकेतील आरोपी राकेश वधवानचा भाजपची आर्थिक संबंध असल्याचा आरोप संजय राऊतांनी केला आहे. राकेश वधवान हा किरीट सोमय्यांचा मुलगा आहे. राकेश वधवान हा पीएसी बँक घोटाळ्याचा मुख्य आरोपी असल्याचे राऊत म्हणाले. त्यामुळे याप्रकरणी सोमय्यांना ताबडतोब अटक करावी, असे ते म्हणाले.
या संपूर्ण प्रकरणाची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चौकशी करावी. पीएमसी बँकेच्या घोटाळाप्रकरणी मी ईडीकडे सर्व कागदपत्रे पाठवली आहेत. ईडी पीएसी बँकेचा तपास करत आहे.