भाजप नेते किरीट सोमैया यांच्यावर काही दिवसांपूर्वी मुंबईत हल्ला करण्यात आला. शिवसैनिकांनी हा हल्ला केला असा सोमैय्यांचा दावा असून या हल्ल्यात सोमैय्यांना झालेल्या जखमेची चांगलीच चर्चा रंगली होती. सोमैयांची जखम खरी कि खोटी याचा पोलीस यंत्रणांकडून तपास सुरु होता. आता किरीट सोमैया यांना झालेली दुखापत गंभीर नसल्याचं भाभा रुग्णालयातील वैद्यकीय अहवालातून स्पष्ट झालं आहे.
किरीट सोमैया यांच्यावर शिवसैनिकांनी हल्ला केला होता. त्यात सोमैय्या जखमी झाल्याचं दिसत होतं. या जखमेची चौकशी केली असता भाभा रुग्णालयाचा वैद्यकीय अहवाल समोर आला आहे. सोमैया यांना किरकोळ जखम झाली असून ती फक्त ०.१ सेंटिमीटरची जखम आहे , सोमैया यांना गंभीर इजा नाही असं भाभा रुग्णालयातील अहवालात म्हंटलं आहे. तसेच, सोमैयांच्या चेहऱ्यावर कोणतीही सूज नाही आणि जखमेमुळे रक्तस्त्राव झालेला नाही असंही या अहवालात म्हंटलं आहे.
भाजप नेते किरीट सोमैया खार पोलीस ठाण्यात राणा दाम्पत्याला भेटण्यास गेले होते. त्यावेळी शिवसैनिकांनी त्यांच्यावर हल्ला केला असा सोमैयांचा दावा आहे . या हल्ल्यात त्यांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आली. त्यामुळे मुंबईत झालेल्या हल्ल्यामुळे सोमैयांनी केंद्रीय गृहसचिवांची भेट घेतली. तसेच या प्रकरणी केंद्रीय गृहमंत्रालयाला लक्ष घालण्याची मागणी त्यांनी केली. किरीट सोमैया यांच्या गाडीवर झालेल्य हल्ल्याप्रकरणी सोमैयांसह भाजपच्या शिष्टमंडळाने दिल्लीत केंद्रीय गृहसचिवांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी याप्रकरणी तपासासाठी विशेष संघ पाठवण्याची विनंती गृहसचिवांना केली आहे.