वांद्रे रेल्वे स्थानकालगतची बांधकामे हटवली

पश्चिम रेल्वेवरील वांद्रे स्थानकाजवळ असलेली 45 अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यात आली.

वांद्रे रेल्वे स्थानकालगतची बांधकामे हटवली

मुंबई : पश्चिम रेल्वेवरील वांद्रे स्थानकाजवळ असलेली 45 अनधिकृत बांधकामे गुरुवारी रेल्वेने आरपीएफ, शहर पोलिस आणि जीआरपीच्या मदतीने जमीनदोस्त केली. ही सर्व अनधिकृत बांधकामे वांद्रे पूर्व बाजूच्या रेल्वे ओव्हर ब्रिजजवळच्या रेल्वेच्या हद्दीत उभारली होती. पश्चिम रेल्वेच्या जमिनीवर अनधिकृत उभारलेल्या बांधकामांमुळे रेल्वेच्या सुरक्षिततेला आणि वाहतुकीला धोका निर्माण झाल्याने ही कारवाई केली असल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले.

 

या कारवाईसाठी जीआरपी, आरपीएफ, शहर पोलीस, अधिकारी, शिपाई अशी प्रशासकीय फौज होती. त्यासोबतच बांधकाम जमीनदोस्त करण्यासाठी कामगार, जेसीबी, ट्रक वापरण्यात आला आहे अशी माहिती पश्चिम रेल्वेकडून देण्यात आली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number