मनसेचे आरोप बांदेकरांनी फेटाळले

आदेश बांदेकरांनी मनसेने केलेले सर्व आरोप फेटाळले आहेत. मनसेचे नेते मनोज चव्हाण यांनी दादरच्या प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिरात साहित्य खरेदीत घोटाळा होत आहे, असे आरोप केले होते, त्या आरोपांवर उत्तर देत श्री सिद्धिविनायक मंदिर न्यासचे अध्यक्ष आदेश बांदेकर यांनी सर्व आरोप खोटे असल्याची माहिती दिली आहे. ‘हिंदू – देवस्थानाला ठरवून बदनाम करत आहेत.’ असं वक्तव्य आदेश […]

मनसेचे आरोप बांदेकरांनी फेटाळले

आदेश बांदेकरांनी मनसेने केलेले सर्व आरोप फेटाळले आहेत. मनसेचे नेते मनोज चव्हाण यांनी दादरच्या प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिरात साहित्य खरेदीत घोटाळा होत आहे, असे आरोप केले होते, त्या आरोपांवर उत्तर देत श्री सिद्धिविनायक मंदिर न्यासचे अध्यक्ष आदेश बांदेकर यांनी सर्व आरोप खोटे असल्याची माहिती दिली आहे.
‘हिंदू – देवस्थानाला ठरवून बदनाम करत आहेत.’ असं वक्तव्य आदेश बांदेकरांनी केलं आहे. तूप घोटाळा प्रकरणी केलेले सर्व आरोप फेटाळताना ‘तुपाची कोठेही विक्री होत नाही, तर हे तूप लाडूंसाठी वापरण्यात येतं, हेच लाडू भाविक घेऊन जातात’, असे स्पष्टीकरण बांदेकरांनी दिलं आहे. तसेच ‘मंदिरात कोणताही भ्रष्टाचार, गैरप्रकार झालेला नाही, सिद्धिविनायकाची सेवा करताना अशी भावना कोणत्याही भाविकांच्या मनात येऊच शकत नाही’, असेही त्यांनी म्हटले आहे.
यावर मनसेचे नेते, मनोज चव्हाण यांनी ‘हा माणूस खोटारडा आहे, पुरावे देऊनही हा माणूस खोटं बोलत आहे’, असे वक्तव्य केले आहे. तसेच या प्रकरणावर खोलवर कारवाई करण्यात यावी अशी मागणीही केली आहे.

अधिकची माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number