मुंबई गोवा महामार्गाची दुरावस्था

मुंबई गोवा महामार्गाची सध्या मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली आहे. पावसाळय़ाची सुरुवात नुकतीच झाली असून, आता मुंबई-गोवा महामार्गावर खड्डय़ांचा त्रास पुन्हा सुरू झाला आहे. दरवर्षी प्रमाणे यावर्षी ही परिस्तिथी समोर आली आहे. मुंबई गोवा महामार्गावर जोरदार पाऊसामुळे दरवर्षी या महामार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडतात आणि याचा त्रास वाहन चालकांना सहन करावा लागतो. कोकणात जाताना त्याचा त्रास […]

मुंबई गोवा महामार्गाची दुरावस्था

मुंबई गोवा महामार्गाची सध्या मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली आहे. पावसाळय़ाची सुरुवात नुकतीच झाली असून, आता मुंबई-गोवा महामार्गावर खड्डय़ांचा त्रास पुन्हा सुरू झाला आहे. दरवर्षी प्रमाणे यावर्षी ही परिस्तिथी समोर आली आहे. मुंबई गोवा महामार्गावर जोरदार पाऊसामुळे दरवर्षी या महामार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडतात आणि याचा त्रास वाहन चालकांना सहन करावा लागतो. कोकणात जाताना त्याचा त्रास होतो. महामार्गावर वडखळ ते इंदापूर मार्गाची सध्या मोठय़ा प्रमाणात दुरवस्था झाली आहे.वडखळ ते इंदापूर मार्गावर सध्या मोठय़ा प्रमाणात खड्डे आहेत. २०११ पासून मुंबई-गोवा महामार्गाच्या पळस्पे ते इंदापूर मार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. बारा वर्षे पूर्ण होत आली तरी ८४ किलोमीटर लांबीचे हे काम पूर्ण होऊ शकलेले नाही.

मुंबई गोवा महामार्गाची सध्या मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली आहे. वडखळ ते इंदापूर मार्गावर खड्यांचे साम्राज्य परसलेले आहे त्यामुळे वाहन चालकांना मोठी कसरत करत यातून मार्ग काढावा लागत असल्याचे समोर आले आहे. महामार्गाची दरवर्षी होणारी दुरावस्था लक्षात घेऊन या रस्त्याचे काँक्रीटीकरणाचा निर्णय घेण्यात आला आहे. कासू ते इंदापूर मार्गाच्या कॉँक्रीटीकरणासाठी ४४० कोटींचा निधीही मंजूर केला आहे. केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत या कामाचा भुमिपूजन समारंभ एप्रिल महिन्यात पार पडले. पण भुमिपुजनानंतर तीन महिने निघून गेले तरी प्रत्यक्ष कामाला सुरुवात झालेली नाही.

महामार्गाच्या पळस्पे ते वडखळ मार्गाचे चौपदरीकरण जवळपास पूर्ण झाले आहे. मात्र वडखळ ते इंदापूरदरम्यान रस्त्याचे काम जवळपास ठप्प आहे. नागोठणे ते वाकण फाटादरम्यान रस्त्याची दुरवस्था कायम आहे. कोलाड परिसरात रस्त्याची कामे झालेली नाहीत. रस्त्यावर ठिकठिकाणी मोठे मोठे खड्डे
पडले आहेत या खड्ड्यांमुळे वाहन चालकांना खूप मोठा त्रास होत असल्याचे चित्र समोर आले आहे. त्यामुळे रस्त्यावर दुतर्फा पुन्हा एकदा अतिक्रमणे झाल्याचे पाहायला मिळत आहे. इंदापूर येथे रस्ता रुंदीकरण झाले नसल्याने वाहतूक कोंडीची ही समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे कोकणवासीयांचा प्रवास खडतर ठरत आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number