अटल बिहारी वाजपेयींचे मराठी प्रेम

आदित्य नीला दिलीप निमकर, मुंबई माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी हे अमोघ वक्तृत्वाबद्दल प्रसिद्ध होते. हिंदी भाषेवरील त्यांचं प्रभुत्व असामान्य होतं. मात्र याचबरोबर मराठी भाषेवरही अटलजींचं प्रेम होतं. आपल्या हिंदी कवितांसाठी ओळखल्या जाणा-या वाजपेयींना मराठी कविता वाचायला आवडत. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या मराठी कवितांनी वाजपेयींना प्रभावित केलं होतं. कुसुमाग्रज यांच्या काही मराठी कवितांचा त्यांनी हिंदीत अनुवादही केला […]

अटल बिहारी वाजपेयींचे मराठी प्रेम

आदित्य नीला दिलीप निमकर, मुंबई

माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी हे अमोघ वक्तृत्वाबद्दल प्रसिद्ध होते.
हिंदी भाषेवरील त्यांचं प्रभुत्व असामान्य होतं. मात्र याचबरोबर मराठी भाषेवरही अटलजींचं प्रेम होतं.
आपल्या हिंदी कवितांसाठी ओळखल्या जाणा-या वाजपेयींना मराठी कविता वाचायला आवडत.

स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या मराठी कवितांनी वाजपेयींना प्रभावित केलं होतं.
कुसुमाग्रज यांच्या काही मराठी कवितांचा त्यांनी हिंदीत अनुवादही केला होता.
तसंच मुंबईतील वास्तव्यात ते ब-याचदा मराठी चित्रपट आणि मराठी नाटकांचा आस्वाद घेत.
मराठी नाटकांवर त्यांचे विशेष प्रेम होते.शिवाजी मंदिरात मराठी नाटक पाहाण्यासाठी वाजपेयी दिवंगत भाजप नेते प्रमोद महाजन यांच्या कुटुंबासह गेले होते.

2004 साली निवडणुकांच्या दरम्यानही वाजपेयींनी ‘श्वास’ हा मराठी चित्रपट पाहाण्याची इच्छा व्यक्त केली. 
तेव्हा त्यांच्यासाठी या सिनेमाचं खास स्क्रीनिंगही आयोजित करण्यात आलं होतं.
चित्रपट पाहिल्यावर वाजपेयी भारावून गेले आणि चित्रपट आपल्याला खूप आवडल्याचीही त्यांनी प्रतिक्रिया दिली होती.

आपण यापुढे पंतप्रधानपदाच्या शर्यतीत नसणार असल्याचंही वाजपेयींनी पहिल्यांदा मराठीतूनच जाहीर केलं होतं.

‘आता बारी नको… पुष्कळ झाले’ अशा मराठी शब्दांत त्यांनी आपल्या पंतप्रधानपदासंबंधीच्या चर्चांना विराम दिला होता.

निरोप एका युगाला…

वाजपेयींना अखेरचा निरोप – Pics

वाजपेयींच्या अंत्यदर्शनाला आलेल्या स्वामी अग्निवेश यांना मारहाण…

वाजपेयींवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार, मानसकन्या नमिता यांनी दिला मुखाग्नी

वाजपेयींच्या श्रद्धांजली प्रस्तावाला विरोध, नगरसेवकाला मारहाण

राज ठाकरेंची व्यंगचित्राद्वारे अटलजींना श्रद्धांजली…

जाणून घ्या वाजपेयींच्या संपत्तीबद्दल…

वाजपेयी यांच्या अंत्यविधीला पाकिस्तानचेही प्रतिनिधी उपस्थित…

वाजपेयींचे मराठी प्रेम

वाजपेयींचे पार्थिव भाजप मुख्यालयात दाखल…

अशुभ ’13’ अंकाशी वाजपेयींचं खास नातं

वाजपेयींच्या पार्थिवावर आज होणार अंत्यसंस्कार…

वाजपेयींच्या पंतप्रधानपदाच्या कारकीर्दीतील 5 निर्णायक घटना!

भारतरत्न अटलजींसाठी सात दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर…

माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची कारकीर्द…

अटलबिहारी वाजपेयींसाठी देशभरात प्रार्थना, देशातील सर्व नेते एम्समध्ये दाखल…

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number