चक्क ‘या’ वयात झाली आई

प्रत्येक स्त्रीला आई होण्याची ईच्छा असते. मात्र ही ईच्छा वयाच्या ७४ वर्षी पूर्ण झाली तर ? आंध्र पद्रेश येथील कोथापेट येथे राहणाऱ्या ७४ वर्षीय आजीने दोन गोंडस मुलींना जन्म दिला आहे. कोथापेट येथील अहाल्या रुग्णालयात या आजीने चक्क दोन जुळ्या मुलींना जन्म दिला आहे. विशेष म्हणजे आई आणि मुलींची प्रकृती उत्तम असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली […]

चक्क ‘या’ वयात झाली आई

प्रत्येक स्त्रीला आई होण्याची ईच्छा असते. मात्र ही ईच्छा वयाच्या ७४ वर्षी पूर्ण झाली तर ? आंध्र पद्रेश येथील कोथापेट येथे राहणाऱ्या ७४ वर्षीय आजीने दोन गोंडस मुलींना जन्म दिला आहे. कोथापेट येथील अहाल्या रुग्णालयात या आजीने चक्क दोन जुळ्या मुलींना जन्म दिला आहे. विशेष म्हणजे आई आणि मुलींची प्रकृती उत्तम असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.

नेमकं काय घडलं ?

आंध्र प्रदेशच्या कोथापेट येथे एका ७४ वर्षीय आजीने दोन जुळ्या मुलींना जन्म दिला असल्याची माहिती समोर आली आहे.

एर्रामत्ती असे या आजी (आई) चे नाव असून त्यांचे पती राजा राव यांचे वय ८० असल्याचे समजते आहे.

पूर्व गोदावरी जिल्ह्यातील नीलापार्थीपाडू या गावात हे जोडपं राहत.

एर्रामत्ती यांना कोथापेट येथील अहाल्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

याच रुग्णालयात त्यांनी दोन जुळ्या मुलींना जन्म दिला आहे.

एर्रामत्ती यांनी आयव्हीएफ तंत्राच्या सहाय्याने दोन जुळ्या मुलींना जन्म दिला आहे.

जास्त वय असल्यामुळे प्रसूतीच्या दरम्यान समस्या निर्माण होत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

मात्र एर्रामत्ती यांच्या शस्त्रक्रियेवेळी कोणतीही अडचण निर्माण झाली नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.

एर्रामत्ती यांना हायपरटेन्शन, मधुमेह अशा आरोग्याच्या समस्या नसल्यामुळे कोणतेही अडथळे आले नाही.

यामध्ये आई आणि दोन्ही मुलींची प्रकृती चांगली असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

 

 

 

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number