मुंबईचे महापौर किशोरी पेडणेकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केल्यामुळे भाजप नेते ऍड. आशिष शेलार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच या प्रकरणी आशिष शेलार यांना जामीन मंजूर झाला आहे. मात्र आशिष शेलार यांनी हा फौजदारी खटला रद्द करण्यासाठी त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाचे दार ठोठावले आहे. आशिष शेलार यांनी स्वत:वरील फौजदारी खटला रद्द करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली आहे.
३० नोव्हेंबर रोजी वरळीमध्ये गॅस सिलिंडरच्या स्फोट झालेल्या घटनेत ४ महिन्याच्या बालकाचा मृत्यू झाला असून त्याच्या आई-वडिलांचाही या दुर्घेटनेत निधन झाले. त्यामुळे याप्रकरणी ४ डिसेंबर रोजी आशिष शेलार यांनी पत्रकार परिषद घेत मुंबई महापौरांवर टीका केली. सिलिंडर स्फोटात ७२ तासानंतर मुंबईचे महापौर पोहोचतात. एवढे तास कुठे निजला होतात, अशी टीका शेलारांनी केली. यावर महापौरांनी आक्षेप घेत राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना पत्र लिहित तक्रार केली. त्यामुळे महापौरांच्या फिर्यादीनंतर ऍड. आशिष शेलार यांच्या विरोधात मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून त्यांच्यावर विनयभंग करणारा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी आशिष शेलार यांनी आज पोलीस ठाण्यात जबाब नोंदवला आहे. तसेच त्यांना जामीनसुद्धा मिळाला आहे. जामीन मिळाला असूनसुद्धा त्यांच्यावरील गुन्हा रद्द करण्यासाठी त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.