आर्यन खान एनसीबी कार्यालयात हजर

  क्रूझवरील ड्रग्जप्रकरणी आर्यन खान एनसीबीच्या अटकेत होता. मुंबई उच्च न्यायालयाने आर्यनचा जामीन मंजूर केला, अखेर आर्यन खान तुरुंगातून बाहेर आला आहे. तुरुंगातून बाहेर निघाल्यावर काही दिवसातच आर्यन खानने एनसीबी कार्यालयात हजेरी लावली आहे.   आर्यन खानचा जामीन मंजूर झाला असला तरीही न्यायालयाने आर्यनवर अनेक अटी घातल्या आहेत. या अटींमध्ये आर्यनला दर शुक्रवारी सकाळी ११ […]

आर्यन खान एनसीबी कार्यालयात हजर

  क्रूझवरील ड्रग्जप्रकरणी आर्यन खान एनसीबीच्या अटकेत होता. मुंबई उच्च न्यायालयाने आर्यनचा जामीन मंजूर केला, अखेर आर्यन खान तुरुंगातून बाहेर आला आहे. तुरुंगातून बाहेर निघाल्यावर काही दिवसातच आर्यन खानने एनसीबी कार्यालयात हजेरी लावली आहे.

  आर्यन खानचा जामीन मंजूर झाला असला तरीही न्यायालयाने आर्यनवर अनेक अटी घातल्या आहेत. या अटींमध्ये आर्यनला दर शुक्रवारी सकाळी ११ ते दुपारी २ वा.च्या दरम्यान एनसीबी कार्यालयात हजर राहण्याची अट घालण्यात आली आहे. त्यामुळे तुरुंगातून बाहेर निघाल्यावर पहिल्यांदाच आर्यनने एनसीबी कार्यालयात हजेरी लावली आहे.

  आर्यन खानसह मुनमुन धमेचा आणि आरबाज मर्चंट यांच्यावरही १४ अटी घालण्यात आल्या आहेत. न्यायालयाच्या परवानगीशिवाय तिघांनाही देशाबाहेर जाता येणार नसून पासपोर्ट जमा करण्याचे तसेच दर शुक्रवारी तिघांनीही एनसीबी कार्यालयात हजर राहण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. तिघांनी मुंबईबाहेर जाण्यासाठी एनसीबी तपास अधिकाऱ्याला त्याची माहिती देऊन प्रवासाचा तपशील एनसीबी कार्यालयात दाखल करावा लागेल.

   न्यायालयाच्या आदेशानुसार, तिघांनाही चौकशीसाठी हजर रहावे लागणार आहे. तसेच न्यायालयाच्या प्रत्येक खटल्यात तीघांनाही हजर रहावे लागणार आहे. प्रकरणाशी संबंधित व्यक्तींशी कोणत्याही प्रकारचे संपर्क न साधण्याचे तसेच आरोपींवर कोणत्याही प्रकारचा परिणाम होईल असे कृत्य न करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

  क्रूझवरील ड्रग्जप्रकरणी आर्यन गेल्या २६ दिवसांपासून अटकेत होता. एक लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर आर्यनची सशर्त जामीन मंजूर करण्यात आला असून आर्यनची तुरुंगातून सुटका झाली आहे. आर्यनच्या जामीन अर्जावरील निकालाच्या प्रतवर सही करण्यासाठी अभिनेत्री जुही चावला न्यायालयात आर्यनची जामीनदार म्हणून दाखल झाली होती.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number