संभाजी भिडेंविरोधात बेळगाव येथे अटक वॉरंट जारी

शिवप्रतिष्ठान संघटनेचे अध्यक्ष संभाजी भिडे यांच्याविरोधात बेळगाव येथे अटक वॉरंट जारी करण्यात आलंय. 2018 साली त्यांच्याविरोधत गुन्हा दाखल करण्यात आला होता. तेव्हापासून आत्तापर्यंतच्या सगळ्या सुनावण्यांना संभाजी भिडे गैरहजर राहिल्यामुळे त्यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी केलंय. नेमका गुन्हा काय? 13 एप्रिल 2018 रोजी बेळगावच्या येळ्ळूर गावात महाराष्ट्र मैदानावर कुस्ती स्पर्धा आयोजित करणअयात आली होती. या कार्यक्रमाला संभाजी […]

संभाजी भिडेंविरोधात बेळगाव येथे अटक वॉरंट जारी

शिवप्रतिष्ठान संघटनेचे अध्यक्ष संभाजी भिडे यांच्याविरोधात बेळगाव येथे अटक वॉरंट जारी करण्यात आलंय. 2018 साली त्यांच्याविरोधत गुन्हा दाखल करण्यात आला होता. तेव्हापासून आत्तापर्यंतच्या सगळ्या सुनावण्यांना संभाजी भिडे गैरहजर राहिल्यामुळे त्यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी केलंय.

नेमका गुन्हा काय?

13 एप्रिल 2018 रोजी बेळगावच्या येळ्ळूर गावात महाराष्ट्र मैदानावर कुस्ती स्पर्धा आयोजित करणअयात आली होती.

या कार्यक्रमाला संभाजी भिडे निमंत्रित होतो.

या कार्यक्रमात त्यांचं भाषणही झालं. याच भाषणादरम्यान त्यांनी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवारांना निवडून द्या, असं आवाहन केलं होतं.

या वक्तव्याविरोधात निवडणूक अधिकाऱ्यांनी संभाजी भिडेंविरोधात गुन्हा दाखल केला.

या नंतरच्या एकाही सुनावणीला संभाजी भिडे हजर राहिले नाही. त्यामुळे त्यांच्याविरोधात थेट अटक वॉरंटच जाहीर करण्यात आलंय.

24 मार्च रोजी पुढील सुनावणी होणार आहे.

संभाजी भिडे यांनी यापूर्वीही अनेक वादग्रस्त वक्तव्य केली आहेत. भीमा-कोरेगाव प्रकरणातही त्यांच्यावर गुन्हा दाखल आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number