‘अनिल देशमुखांना कधीही पैसे दिले नाहीत’ – सचिन वाझे

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि पोलीस अधिकारी सचिन वाझे यांची चांदीवाल आयोगाकडून चौकशी करण्यात आली. यावेळी सचिन वाझे आणि अनिल देशमुख यांची समोरासमोर चौकशी करण्यात आली असून अनिल देशमुखांना कधीही पैसे दिले नाहीत, असा जवाब सचिन वाझे यांनी चांदिवाल आयोगासमोर दिला आहे. चांदिवाल आयोगासमोर सचिन वाझे आणि अनिल देशमुख यांना समोरासमोर बसवून प्रश्न विचारण्यात […]

‘अनिल देशमुखांना कधीही पैसे दिले नाहीत’ – सचिन वाझे

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि पोलीस अधिकारी सचिन वाझे यांची चांदीवाल आयोगाकडून चौकशी करण्यात आली. यावेळी सचिन वाझे आणि अनिल देशमुख यांची समोरासमोर चौकशी करण्यात आली असून अनिल देशमुखांना कधीही पैसे दिले नाहीत, असा जवाब सचिन वाझे यांनी चांदिवाल आयोगासमोर दिला आहे.

चांदिवाल आयोगासमोर सचिन वाझे आणि अनिल देशमुख यांना समोरासमोर बसवून प्रश्न विचारण्यात आले. त्यावेळी अनिल देशमुखांना कधीही पैसे दिले नसल्याचे स्पष्टीकरण सचिन वाझे यांनी दिले आहे. त्यामुळे अनिल देशमुख यांच्यावरील आरोप निकालात निघण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी या दोघांद्वारे खंडणी केल्याचा आरोप केला होता. त्यामुळे ईडीने अनिल देशमुख यांचे सहाय्यक कुंदन शिंदे आणि संजीव पालांडे यांना अटक केली होती. तसेच १०० कोटी खंडणीप्रकरणी अनिल देशमुखांना अटक करण्यात आली होती. मात्र काही दिवसांपूर्वी माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी कोणतेही पुरावे नसल्याचे म्हटले. तसेच आता सचिन वाझे यांनीदेखील अनिल देशमुखांना कधीही पैसे दिले नसल्याचे स्पष्टीकरण दिले आहे. त्यामुळे आता देशमुखांवरील आरोप निकालात निघण्याची शक्यता आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number