‘आंदोलनाच्या मागे कुणाचं डोकं?’ – दिलीप वळसे-पाटील

एसट संपाबाबत उच्च न्यायालयाने निर्णय दिल्यानंतर एसटी कर्मचारी आक्रमक झाले आहेत. संपकारी कर्मचारी थेट राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्वर ओक निवासस्थानी धडकले. यावेळी कर्मचाऱ्यांनी शरद पवारांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. दरम्यान, पवारांच्या घराबाहेरी निदर्शने अस्थानी आणि अनाठायी आहेत, अशी प्रतिक्रिया गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली आहे. तसेच या आंदोलनाच्या मागे कुणाचे डोकं?, असा […]

‘आंदोलनाच्या मागे कुणाचं डोकं?’ – दिलीप वळसे-पाटील

एसट संपाबाबत उच्च न्यायालयाने निर्णय दिल्यानंतर एसटी कर्मचारी आक्रमक झाले आहेत. संपकारी कर्मचारी थेट राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्वर ओक निवासस्थानी धडकले. यावेळी कर्मचाऱ्यांनी शरद पवारांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. दरम्यान, पवारांच्या घराबाहेरी निदर्शने अस्थानी आणि अनाठायी आहेत, अशी प्रतिक्रिया गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली आहे. तसेच या आंदोलनाच्या मागे कुणाचे डोकं?, असा सवालही वळसे-पाटील यांनी उपस्थित केला आहे.

शरद पवार यांच्या घरासमोर संपकारी कर्मचाऱ्यांनी दगडफेक करत आंदोलन केले. या घटनेवर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांन ट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे. एसटी कर्मचाऱ्यांसाठी मविआ सरकारने चर्चेचा मार्ग नेहमीच मोकळा ठेवला आहे. न्यायालयीन प्रक्रियेचा आदर करणे क्रमप्राप्त आहे. सांविधानिक मार्गाने तसेच संवादाच्या माध्यमातून त्यांनी आपले प्रश्न समोर मांडावेत. तसेच आंदोलनाला अनिष्ट वळण देऊन कर्मचाऱ्यांनी कायदा हातात घेऊ नये, असे आवाहनही दिलीप वळसे-पाटील यांनी संपकारी कर्मचाऱ्यांना केले आहे.

दरम्यान, राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी तणावग्रस्त परिस्थिती शांत करण्याचा प्रयत्न केला. तसेच तसेच हा प्रश्न शांततेच्या मार्गाने सोडवण्याचा पर्याय त्यांनी कर्मचाऱ्यांसमोर ठेवला आहे. शांततेच्या मार्गाने आम्ही एसटी कर्मचाऱ्यांशी चर्चा करण्यास तयार आहोत, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीच्या खासदरा सुप्रिया सुळे यांनी दिली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number