अनंत अंबानी, राधिका मर्चंट यांचा साखरपुडा

उद्योगपती मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी हा राधिका मर्चंटसोबत लग्नगाठ बांधणार आहे. अनंत आणि राधिका यांच्या प्री-वेडिंग प्रोग्रॅम्सला सुरुवात झाली आहे. मंगळवारी मेहंदी सोहळा पार पडला. तर गुरुवारी राधिका आणि अनंत यांचा साखरपुडा पार पडला. राधिका आणि अनंत यांच्या साखरपुड्याला अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली. अंबानींच्या मुंबईतील अँटिलिया या निवासस्थानी त्या अनंत […]

अनंत अंबानी, राधिका मर्चंट यांचा साखरपुडा

उद्योगपती मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी हा राधिका मर्चंटसोबत लग्नगाठ बांधणार आहे. अनंत आणि राधिका यांच्या प्री-वेडिंग प्रोग्रॅम्सला सुरुवात झाली आहे. मंगळवारी मेहंदी सोहळा पार पडला. तर गुरुवारी राधिका आणि अनंत यांचा साखरपुडा पार पडला. राधिका आणि अनंत यांच्या साखरपुड्याला अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली.

अंबानींच्या मुंबईतील अँटिलिया या निवासस्थानी त्या अनंत आणि राधिका यांचा साखरपुडा पार पडला. त्यांच्या साखरपुड्यासाठी अतिशय जय्यत तयारी करण्यात आली होती. अगदी राजेशाही थाटात त्या दोघांचा साखरपुडा पार पडला. गेले काही दिवस राधिकाच्या मेहंदीचे फोटोही समोर आले होते. अनंत आणि राधिका गेल्या अनेक वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत. राधिका अंबानी कुटुंबाच्या प्रत्येक लहान-मोठ्या कार्यक्रमांचा भाग असते. त्या दोघांच्या नात्याबद्दल बऱ्याच दिवसांपासून चर्चा होत्या. त्यातच आता दोघांचाही साखरपुडा पार पडला आहे. त्यांचे अनेक फोटोही समोर आले आहे.

राधिका मर्चंट कोण आहे?

राधिका ही एनकोर हेल्थकेअरचे सीईओ बिरेन मर्चंट आणि शैला मर्चंट यांची मुलगी आहे. राधिका मर्चंटचा जन्म १६ डिसेंबर १९९४ रोजी झाला. ती आता २८ वर्षांची आहे. राधिका गुजराती असून बीडी सोमाणी इंटरनॅशनल स्कूलमध्ये तिचं प्राथमिक शिक्षण झालं. त्यानंतर तिने मुंबईतील द कॅथेड्रल आणि जॉन कॉनन स्कूलमध्ये शिक्षण घेतलं.

अनंत अंबानी व्यतिरिक्त, राधिकाचे नीता अंबानी आणि त्यांची मुलगी ईशा यांच्याशीही छान जमतं. या वर्षाच्या मध्यात अंबानी कुटुंबीयांनी राधिकासाठी ‘अरंगेत्रम’ सोहळ्याचं आयोजन केलं होतं. त्यानंतर राधिका आणि अनंतच्या लग्नाच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. अखेर त्यांचा साखरपुडा पार पडला आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number