अमोल काळेंनी राऊतांचे आरोप फेटाळले

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत, देवेंद्र फडणवीस सरकारच्या कळात २५ हजार कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप केला. तसेच या घोटाळ्यामध्ये अमोल काळे आणि विजय ढवंगाळे मुख्य सूत्रधार असल्याचे संजय राऊतांनी सांगितले होते. दरम्यान, अमोल काळेंनी राऊतांनी केलेले आरोप फेटाळून लावले आहेत. अमोल काळे म्हणाले, महाराष्ट्र शासनाचे कोणतेही कंत्राट मी घेतलेले नाही. माझी […]

अमोल काळेंनी राऊतांचे आरोप फेटाळले

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत, देवेंद्र फडणवीस सरकारच्या कळात २५ हजार कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप केला. तसेच या घोटाळ्यामध्ये अमोल काळे आणि विजय ढवंगाळे मुख्य सूत्रधार असल्याचे संजय राऊतांनी सांगितले होते. दरम्यान, अमोल काळेंनी राऊतांनी केलेले आरोप फेटाळून लावले आहेत.

अमोल काळे म्हणाले, महाराष्ट्र शासनाचे कोणतेही कंत्राट मी घेतलेले नाही. माझी बदनामी करण्याचा हा डाव आहे. जो कोणी माझी बदनामी करत आहे, त्यांच्यावर मी कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा अमोल काळे यांनी दिला आहे. तसेच ते म्हणाले, मी एक खासगी व्यावसायिक आहे. संजय राऊतांनी म्हटल्याप्रमाणे मी कुठेही परदेशात पळून गेलेलो नाही. तर माझ्याबाबत फक्त संभ्रम निर्माण केला जात आहे. मी मुंबई क्रिकेट असोसिएशनचा उपाध्यक्ष असल्यामुळे कोणतेही कंत्राट घेण्याचा प्रश्न येत नाही, असे स्पष्टीकरण अमोल काळे यांनी दिले आहे.

काय आहेत संजय राऊतांचे आरोप?

देवेंद्र फडणवीस काळात महाआयटीमध्ये २५ हजार कोठी रुपयांचा घोटाळा झाला असल्याचा आरोप संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत केला. तसेच या घोटाळ्यामध्ये अमोल काळे आणि आणि विजय ढवंगाळे यांचाही हात असल्याचे ते म्हणाले. यांच्या बँक खात्यातून पैसे कुठे कुठे गेले, विना टेंडर कोणाला कंत्राट दिले गेले, हा पैसा कुठे कुठे गेला, याची तक्रार करणार असल्याचे राऊत म्हणाले. अमोल काळे हा कोण आहे, याचा खुलासा भाजपने करावा, अन्यथा आम्ही त्याला समोर आणू, असा इशाराही संजय राऊतांनी दिला आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number