अंबरनाथ: अंबरनाथ रेल्वे स्थानकात एका अंध व्यक्तीला मारहाण केल्याची घटना घडली आहे. दिलीप मोरे असं या अंध व्यक्तीचं नाव आहे. दिलीप यांनी आपल्या मित्रासोबत उपहारगृहात जाऊन समोसा विकत घेतला.
११ रुपयांचा समोसा १३ रुपयाला दिल्याने मोरे यांनी उपहारगृह चालकाला दोन रुपये जास्त का घेतले? असा जाब विचारल्यानंतर उपहारगृह चालक आणि दिलीप मोरे त्यांच्यात बाचाबाची झाली. यावेळी उपहारगृह चालकाने मोरे यांच्या हातावर धारदार शस्त्राने वार केले. यामुळे दिलीप मोरे जखमी झाले आहेत.
या घटनेबाबत कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यात कॅटिंग चालकाविरोधत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संपादन: सिद्धी भरत पाटील