आज विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा चौथा दिवस आहे. यादरम्यान आज विधानसभेत ओबीसी आरक्षणाबाबत सर्वपक्षीय बैठक होत आहे. तसेच पुढील निवडणुकीत आरक्षण कसे देता येईल, याबाबत बैठकित चर्चा होणार आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या सूचनेप्रमाणे ५० टक्क्यांपेक्षा अधिक आरक्षण जाणार नाही याची काळजी कशी घ्यायची याबाबत बैठकीत चर्चा होणार आहे. कुठल्या भागात, कुठल्या निवडणुकीत ओबीसी आरक्षण ५० टक्के पेक्षा अधिक होते याची याची चाचपणी करणार आहे. सर्वोच्च न्यायालयासमोर भूमिका मांडतांना इम्पिरिकल डेटा तयार करताना कशा प्रकारची तयारी करायची, याबाबत सर्वपक्षीय चर्चा होणार आहे.