MCA Presidant Ajinkya Naik : एमसीएच्या अध्यक्षपदी अंजिक्य नाईक यांची बिनविरोध निवड; तर मिलिंद नार्वेकर खजिनदार

मुंबई क्रिकेट असोसिएशन (एमसीए) ची निवडणूक पार पडली असून सलग दुसऱ्यांदा अजिंक्य नाईक यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आही.

MCA Presidant Ajinkya Naik : एमसीएच्या अध्यक्षपदी अंजिक्य नाईक यांची बिनविरोध निवड; तर मिलिंद नार्वेकर खजिनदार

मुंबई : मुंबई क्रिकेट असोसिएशन (एमसीए) ची निवडणूक पार पडली असून सलग दुसऱ्यांदा अजिंक्य नाईक यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आही. एमसीएच्या अध्यक्षपदासाठीचा अर्ज जितेंद्र आव्हाड यांनी मागे घेतला असून विहंग प्रताप सरनाईक आणि मिलिंद नार्वेकर यांनी आपले निवडणुकीतून माघार घेतली आहे.

दरम्यान, अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर अजिंक्य नाईक यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, “MCA हे एक कुटुंब आहे. कुटुंबात वादविवाद होत असतात. पण आमचा एकच अजेंडा आहे, तो म्हणजे क्रिकेट. शरद पार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आमचे आधारस्तंभ आहेत. त्यांच्यामुळेच हे शक्य झालं. त्या दोघांचेही असे म्हणणे होते की, जे कामकाज गेले काही काळ सुरू आहे ते पुढेही व्यवस्थित सुरू रहावे.” 

हेही वाचा : UIDAI e-Aadhar Card: आधार कार्ड हरवलंय आणि नंबरही आठवत नाहीये? काळजी नको! अशा प्रकारे करा घरबसल्या डाउनलोड

यावेळी, “तुमच्या सगळ्यांसमोर मी त्यांना शुभेच्छा देतो. त्यांना 11 महिन्याचा कालावधी मिळाला होता. येत्या काळात ते चांगले काम करतील. अमोल काळे यांची कामे पुढे नेतीलं”, असे भाजप आमदार प्रसाद लाड म्हणाले. तर, “ठिक आहे एक अर्ज माझ्या विरोधात आहे. जो मतदार राजा आहे तो योग्य निवड करेल. शरद पवार यांनी एक यादी ठरवली आहे. जी मुख्यमंत्री यांनासुद्धा हवी आहे, तर ते होईल”, असे मत राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार गट) जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केले. तसेच, “इच्छा असते सगळ्यांचीं पण मोठ्यांचे ऐकायचे असते. त्यांनी सांगितले मी केले. गेल्यावेळी मी विचार केला की, मी आमदार होतोय ना. हे पद बदलत असतं”, असे मत शिवसेना (ठाकरे गट) सचिव मिलिंद नार्वेकर यांनी व्यक्त केले. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number