Lalbaugcha Raja : लालबागचा राजाच्या विसर्जनानंतर ‘या’ समितीने पाठवले मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र; जाणून घ्या

तब्बल 33 तासानंतर, रविवारी गिरगाव चौपाटी येथे लालबागचा राजाचा विसर्जन सोहळा पार पडला. अरबी समुद्राला भरती आल्याने लालबागचा राजाच्या विसर्जनाला साडे बारा ते तेरा तासांचा वेळ लागला.

Lalbaugcha Raja : लालबागचा राजाच्या विसर्जनानंतर ‘या’ समितीने पाठवले मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र; जाणून घ्या

मुंबई: तब्बल 33 तासानंतर, रविवारी गिरगाव चौपाटी येथे लालबागचा राजाचा विसर्जन सोहळा पार पडला. अरबी समुद्राला भरती आल्याने लालबागचा राजाच्या विसर्जनाला साडे बारा ते तेरा तासांचा वेळ लागला. तसेच, लालबागच्या राजाच्या विसर्जन सोहळ्यासाठी गुजरातहून आणलेल्या खास तराफ्यात अडखळे येत होते. त्यामुळे, लालबागच्या राजाच्या विसर्जन सोहळ्याला विलंब झाला आणि चंद्रग्रहणाच्या वेळी विसर्जन समारंभ पार पडला. या घटनेनंतर, सोमवारी अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ईमेलद्वारे मागणी केली, अशी माहिती अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीचे अध्यक्ष देवेंद्र दामोदर तांडेल यांनी दिली.

सन 1934 साली लालबागचा राजा या गणपतीची स्थापना कोळी समाजातील महिलांनी केल्याचा इतिहास आहे. तसेच, कोळी महिलांच्या मनोकामना पूर्ण झाल्याने बाप्पांची स्थापना लालबाग येथे करण्यात आली होती. कालांतराने, लालबागच्या राजाचे दर्शन घेतल्यानंतर अनेक गणेशभक्तांच्या इच्छा आणि आकांक्षा पूर्ण होऊ लागल्या. त्यानंतर, लालबागच्या राजाची ओळख नवसाला पावणारा गणपती म्हणून निर्माण झाली. त्यामुळे, भाविक लाखोंच्या संख्येने लालबागच्या राजाचे दर्शन घेतात. 

मात्र. 'लालबागचा राजा लोकप्रिय झाल्यानंतर, संबंधित मंडळातील सदस्यांनी ह्या संपूर्ण उत्सवाचे बाजारीकरण करण्यास सुरुवात केली, असा आरोप अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीने केला. पुढे, त्यांनी असेही म्हटले की, ज्या भाविकांनी या मंडळाला प्रचंड प्रसिद्धी आणि पैसा मिळवून दिला होता, त्याच भाविकांना शारीरिक आणि मानसिक त्रास देत असल्याचे अनेक व्हिडिओ व्हायरल झाले. त्यामुळे, भविष्यात असा प्रकार पुन्हा होऊ नये, यासाठी तक्रार नोंदवण्यात आली', अशी माहिती अखिल महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीचे अध्यक्ष देवेंद्र दामोदर तांडेल यांनी दिली.

तसेच, समितीकडून चार मागण्या करण्यात आले. ज्यात प्रामुख्याने अशी मागणी केली की, 'मंडळाच्या कार्यकर्त्याने ज्या सामान्य बापाच्या लेकरूला अमानूष रित्या वागणूक देण्यात आली होती. त्यामुळे, अशा कार्यकर्त्याला किंवा हा व्यक्ती जर पोलिस दलाचा अधिकारी किंवा कोणी मोठा उद्योगपतीचा खाजगी सुरक्षा रक्षक असल्यास अशा इस्मानांना अटक करून त्यांच्यावर फौजदारीचा गुन्हा दाखल करून त्यांना सेवेतून बडतर्फ करण्यात यावी'.

'गणपती हा सर्वांचा आहे, कोणा एका श्रीमंताच्या मालकीचा नाही. ज्या निरागस भक्तांकडे आयुष्यात काहीच नाही, अशाच भक्तांकडे बाप्पा खऱ्या अर्थाने येत असतो आणि हे लालबाग येथील मासळी विक्रेत्या कोळी महिलांनी सत्तर वर्षांपूर्वी सर्वांना दाखवून दिले आहे. कारण आज लालबाग गणेशोत्सव मंडळाकडे करोडीची संपती आल्याने मंडळातील कार्यकर्त्यांना आज जो काही माज चढला आहे तोच माज उतरविण्यासाठीच जणू बाप्पांनी मंडळातील कार्यकर्त्यांकडून विसर्जन घडवून न आणता कोळीवाड्यातील कष्टकरी कोळी बांधवांच्या हस्ते विसर्जन घडवून आणले', असे ईमेलमध्ये नमूद करण्यात आले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number