मराठी आणि हिंदी चित्रपट तसेच मालिकेतील प्रसिद्ध अभिनेत्री आसावरी जोशी यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. मुंबईत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत आसावरी जोशी यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष चित्रपट आणि सांस्कृतिक विभाय यापदी आसावरी जोशी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस हा कलाकारांसाठी झटणारा आणि त्यांच्या प्रश्नांवर तोडगा काढणारा पक्ष आहे, असे आसावारी जोशी यांनी आपल्या भाषणात म्हटले आहे. तसेच त्या म्हणाल्या, मी या पक्षात प्रवेश करणार असल्याचे यापूर्वीच जाहीर झालं होतं. १५ फेब्रुवारी रोजी मी राष्ट्रवादीत प्रवेश करणार होते. मात्र, काही कारणास्त पक्षप्रवेश होऊ शकला नाही. म्हणून आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत मुंबईतील राष्ट्रवादीच्या कार्यालयात पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडला.
अभिनेत्री आसावरी जोशी यांनी हिंदी, मराठी चित्रपट तसेच अनेक मालिकांच्या माध्यमातून घराघरात पोहोचल्या. आसावरी जोशी सध्या स्टार प्रवाह वाहिनीतील ‘स्वाभिनान : शोध अस्तित्वाचा’ या मालिकेत आईच्या भूमिकेत झळकत आहेत. आसावरी जोशी यांच्या अभिनयाने चाहत्यांना भुरळ पाडली आहे. ‘माझं घर माझा संसार’ या चित्रपटातून आसावरी जोशी यांनी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते. त्यानंतर त्यांनी अनेक चित्रपट, मालिकेत अभिनय केले आहे.