मुंबई-नाशिक महामार्गावर अपघात

भिवंडी तालुक्यातील सोनाळे ग्रामपंचायतीच्या हद्दीत पहाटे पावणे सहा वाजता अपघात झाला. कामगारांना भिवंडीकडे घेऊन येणाऱ्या बस चालकाचा बसवरील ताबा सुटल्याने विरुद्ध दिशेने येणाऱ्या कंटेनरला धडक दिली. या अपघातात एका कामगाराचा मृत्यू झाला असून तीनजण गंभीर जखम आहे. जखमींमध्ये महिला कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. वाहूली येथे ॲमेझॉन कंपनीच्या गोदामात काम करणाऱ्या महिला कामगारांना पहाटे घरी सोडण्यासाठी मुंबई […]

मुंबई-नाशिक महामार्गावर अपघात

भिवंडी तालुक्यातील सोनाळे ग्रामपंचायतीच्या हद्दीत पहाटे पावणे सहा वाजता अपघात झाला. कामगारांना भिवंडीकडे घेऊन येणाऱ्या बस चालकाचा बसवरील ताबा सुटल्याने विरुद्ध दिशेने येणाऱ्या कंटेनरला धडक दिली. या अपघातात एका कामगाराचा मृत्यू झाला असून तीनजण गंभीर जखम आहे. जखमींमध्ये महिला कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

वाहूली येथे ॲमेझॉन कंपनीच्या गोदामात काम करणाऱ्या महिला कामगारांना पहाटे घरी सोडण्यासाठी मुंबई नाशिक महामार्गावरून मिनी बस निघाली. दरम्यान, सोनाळे गावातील साईधाम चौक या ठिकाणी बस चालकाचा बसवरील ताबा सुटला. नंतर, बस रस्ता दुभाजक ओलांडून मुंबई नाशिक या वाहिनीवरील कंटेनरला जाऊन धडकली. या मिनी बसमध्ये सहा महिला कामगार, एक महिला सुरक्षा कर्मचारी, एक पुरुष सुरक्षा कर्मचारी आणि चालक, असे नऊ जण होते.

या अपघातात पुरुष सुरक्षा कर्मचाऱ्याचा जागेवरच मृत्यू झाला. बस चालक व दोन महिला कर्मचारी गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यामुळे त्यांना खाजगी रुग्णालयात उपचाराकरीता दाखल करण्यात आले तर, इतर पाच महिलांवर उपचार करून त्यांना सोडून देण्यात आले आहे. या घटनेनंतर भिवंडी तालुका पोलीस ठाणे यांचे पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान, याप्रकरणी बस चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number