जळगावमध्ये घराचे छत कोसळून आजी आणि सव्वा महीन्याच्या नातवाचा मृत्यू

जळगाव जिल्ह्यातील पाचोरात मातीचे छत कोसळल्याची घटना घडली आहे. पाचोरा तालुक्यातील नांदरा येथे नामदेव पाटील यांचा परिवार भाड्याच्या घरामध्ये राहत होता. काही दिवसांपूर्वीच नामदेव पाटील यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. त्यानंतर त्यांच्या पत्नी शोभाबाई आपल्या मुलांना घेऊन तेथे राहत होत्या. काही दिवसांपासून परिसरामध्ये जोरदार पाऊस सुरू असून मातीच्या घरांमध्ये पाणी मुरल्याने अपघात घडला आहे.  […]

जळगावमध्ये घराचे छत कोसळून आजी आणि सव्वा महीन्याच्या नातवाचा मृत्यू

जळगाव जिल्ह्यातील पाचोरात मातीचे छत कोसळल्याची घटना घडली आहे. पाचोरा तालुक्यातील नांदरा येथे नामदेव पाटील यांचा परिवार भाड्याच्या घरामध्ये राहत होता. काही दिवसांपूर्वीच नामदेव पाटील यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे.

त्यानंतर त्यांच्या पत्नी शोभाबाई आपल्या मुलांना घेऊन तेथे राहत होत्या. काही दिवसांपासून परिसरामध्ये जोरदार पाऊस सुरू असून मातीच्या घरांमध्ये पाणी मुरल्याने अपघात घडला आहे.  काल मध्यरात्री रात्री सर्व झोपलेले असताना घराचे छत कोसळल्याची दुर्देवी घटना घडली आहे. त्यामध्ये शोभाबाई नामदेव पाटील या 50 वर्षीय महिलेचा मृत्यू झालेला आहे. त्या महिलेचा नातू समर्थ पाटील या केवळ सव्वा महिन्याच्या बाळाचा मृत्यू झालेला आहे.

शोभाबाई यांची मुलगी ही बाळंतपणासाठी माहेरी आलेली होती. मोलमजुरी करून त्या आपला उदरनिर्वाह करायच्या. दरम्यान घराचे छत कोसळून त्यात ढिगाऱ्याखाली अडकून आजी आणि नातवाचा मृत्यू झालेला आहे. या घटनेने परिसरामध्ये मोठी शोककळा पसरली आहे. या परिवारातील ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांना परिसरातील लोकांनी बाहेर काढले आहे. शोभाबाई यांचा मुलगा आणि मुलगी जखमी असून त्यांना उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number