मीरा रोड येथील एका 32 वर्षीय व्यक्तीने आपल्या जवळील तीन मांजरींना जाळल्याची घटना घडली आहे.
ठाणे ग्रामीण पोलिसांनी या व्यक्तीला अटक केले आहे.
सिद्धेश पटेल असे त्याचे नाव असून आपल्या राहत्या घरात जाळल्याची माहिती त्याने पोलिसांना दिली आहे.
सिद्धेशने आपल्या मजेसाठी या मांजरींना एका बॉक्समध्ये टाकून बॉक्स पेटवून दिले, असे सिद्धेश पटेलने पोलिसांना सांगितले.
मात्र या घटनेत मांजरी सुरक्षीत असून थोडक्यात बचावले असल्याचे म्हटलं आहे.
तिन्ही मांजरींवर उपचार सुरू असून एका मांजर गंभीर आहे.
सिद्धेश पटेलवर IPC 429 चा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.