चहा प्रेमी चहासाठी काहीही करु शकतात पण एकच व्यक्ती एका वेळीस किती चहा पिऊ शकतो ? एक, दोन किंवा जास्तीत जास्त तीन कप चहा पिऊ शकतो. मात्र पुण्यातील एका चहाप्रेमीने चक्क 7 मिनिटात 45 कप चहा प्यायल्याची घटना घडली आहे. या चहाप्रेमीचे नाव सचिन शिंदे असून त्याच्या मित्रांनी मिळून पैज लावली होती. जो कोणी 20 मिनिटात 45 कप संपवेल तो पैज जिंकून त्याला एक हजार रुपये बक्षिस म्हणून दिले जातील.
पुणे येथील भिगवणमध्ये मित्रांमध्ये चहा पिण्याची पैज लागली होती.
20 मिनिटात 45 कप चहा पिण्याची पैज लागली होती.
त्याचबरोबर जो कोणी ही पैज पूर्ण करेल त्याला एक हजार रुपये बक्षिस म्हणून दिले जातील.
दोन जणांमध्ये लागलेल्या पैजमध्ये सचिन शिंदे नावाच्या चहाप्रेमीने ही पैज जिंकली.
सचिनने एका मोठ्या भांड्यात 45 कप चहा घेत अवघ्या 9 मिनिटात चहा संपवला आणि पैज जिंकली.