मध्य रेल्वेवर रविवारी सीएसएमटी-विद्याविहार दरम्यान मेगाब्लॉक, असे असेल वेळापत्रक

मध्य रेल्वेवर आणि हार्बर मार्गावर मोठ्या प्रमाणात मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.

मध्य रेल्वेवर रविवारी सीएसएमटी-विद्याविहार दरम्यान मेगाब्लॉक, असे असेल वेळापत्रक

मुंबई: 18 एप्रिल म्हणजेच येत्या रविवारी, मध्य रेल्वेवर आणि हार्बर मार्गावर मोठ्या प्रमाणात मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी )  ते विद्याविहार, तसेच ठाणे ते वाशी/नेरूळ या लोकल मार्गावर देखील ब्लॉक असणार आहे . प्रवाशांनी प्रवासाच्या आधी वेळापत्रकाची माहिती घेऊन नियोजन करणे गरजेचे आहे.

 मध्य रेल्वेवरील मेगाब्लॉक: सीएसएमटी – विद्याविहार दरम्यान
रविवारी, सकाळी 10.55 ते दुपारी 3.55 या वेळेत सीएसएमटी ते विद्याविहार स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावर मेगाब्लॉक जाहीर करण्यात आला आहे.या कालावधीत सीएसएमटी वरून सकाळी 10.48 ते दुपारी 3.45 या वेळेत सुटणाऱ्या डाऊन धीम्या मार्गावरील लोकल गाड्या डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येतील.

परिणामी, मस्जिद, सँडहर्स्ट रोड, चिंचपोकळी आणि करी रोड या स्थानकांवर रेल्वे थांबणार नाहीत. या स्थानकांवरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी पर्यायी व्यवस्था वापरण्याचा सल्ला देण्यात येत आहे.

 हार्बर रेल्वे मार्गावरही सेवा ठप्प
त्याच दिवशी ठाणे आणि वाशी/नेरूळ दरम्यानच्या ट्रान्स-हार्बर मार्गावर देखील ब्लॉक असणार आहे 

 वेळ: सकाळी 11.10 ते संध्याकाळी 4.10
 यावेळी डाऊन आणि अप मार्गावरील लोकल सेवा रद्द राहतील.
 त्यामुळे ठाणे, वाशी, नेरूळ आणि पनवेलकडे जाणाऱ्या प्रवाशांनी पर्यायी प्रवास मार्गाचा अवलंब करावा लागणार आहे.

शुक्रवार रात्रीचा फास्ट मार्ग ब्लॉक
मध्य रेल्वेच्या जलद मार्गावर वसई रोड ते वैतरणा दरम्यान देखील ब्लॉक जाहीर करण्यात आला आहे.

 अप फास्ट मार्गिका: रात्री 11.50 ते 2.50
डाउन फास्ट मार्गिका: रात्री1.30 ते पहाटे 4.30

या वेळेत गाड्यांच्या वेळांमध्ये बदल होण्याची शक्यता आहे.

 प्रवाशांसाठी सूचना:
प्रवासाच्या आधी रेल्वेच्या अधिकृत वेळापत्रकाची माहिती घ्यावी. 

आवश्यक असल्यास पर्यायी मार्ग निवडावा.

प्रवासात अडथळा टाळण्यासाठी वेळेआधी स्टेशनवर पोहोचावे.

मोबाइल अ‍ॅप, रेल्वे वेबसाइट किंवा हेल्पलाईनद्वारे माहिती मिळवावी. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number