विक्रांत बचाव मोहिमप्रकरणी भाजप नेते किरीट सोमैया यांची सोमवारपासून सलग चार दिवस चौकशी सुरू झाली आहे. आर्थिक गुन्हे विभागाकडून सोमैयांची चौकशी सुरू झाली आहे.
किरीट सौमय्यांना आर्थिक गुन्हे विभागाकडून समन्स बजावण्यात आले होते. त्यानुसार आज सोमैया आर्थिक गुन्हा विभागात दाखल झाले आहेत. आजपासून सलग चार दिवस सौमयांची आयएनएस विक्रांत बचाव मोहिम प्रकरणी चौकशी होणार आहे.
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजप नेता किरीट सोमय्या यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. विक्रांत युद्धनौकेच्या नावावर ५८ कोटी रुपयांची रक्कम लाटली असल्याचा आरोप संजय राऊतांनी केला आहे. संजय राऊतांनी आरोप केला की, भाजप नेते किरीट सोमय्या यांनी २०१४ साली विक्रांत युद्धनौका वाचवण्यासाठी पैसे गोळा करण्याची मोहीम सुरू केली होती. या मोहिमेत ५७ ते ५८ कोटी रुपयांची रक्कम झाली होती. पण ही रक्कम राज्यपाल कार्यालयात पोहचले नसल्याचे समोर आले आहे. सोमय्यांनी विक्रांत युद्धनौकेच्या नावावर लाटलेली रक्कम २०१४च्या निवडणूकीसाठी आणि त्यांच्या निकॉन इन्फ्रा कंपनीत वळवला आहे. हा घोटाळा म्हणजे किरीट सोमय्यांनी देशाच्या संरक्षण व्यवस्थेशी, राष्ट्रीय भावनेशी केलेली प्रतरणा आहे.
विक्रांत बचाव मोहिमप्रकरणी आर्थिक गुन्हे विभागाने किरीट सोमैया आणि नील सोमैया यांना नोटीस पाठवली होती. त्यानुसार त्यांना चौकशीसाठी बोलवण्यात आले होते. मात्र, ते चौकशीसाठी हजर राहिले नाही. त्यामुळे आजपासून सोमैयांची सलग चार दिवस चौकशी होणार आहे. आज सोमैया आर्थिक गुन्हे विभागात दाखल झाले असून त्यांची चौकशी होत आहे.