Kasara Local Mega Block: कसारा-इगतपुरी मार्गावर 4 दिवस मेगाब्लॉक; आसनगाव पुढील लोकल सेवा होणार विस्कळीत, पाहा नवीन वेळापत्रक

मध्य रेल्वेने ओव्हरहेड उपकरणांच्या देखभाल-दुरुस्तीच्या कामासाठी 2 जून ते 5 जून 2026 या कालावधीत विशेष ट्रॅफिक व पॉवर ब्लॉक जाहीर केला आहे.

Kasara Local Mega Block: कसारा-इगतपुरी मार्गावर 4 दिवस मेगाब्लॉक; आसनगाव पुढील लोकल सेवा होणार विस्कळीत, पाहा नवीन वेळापत्रक

Kasara Local Mega Block: कसारा आणि इगतपुरीदरम्यान लोकलने प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांसाठी महत्त्वाची सूचना आहे. मध्य रेल्वेने ओव्हरहेड उपकरणांच्या देखभाल-दुरुस्तीच्या कामासाठी 2 जून ते 5 जून 2026 या कालावधीत विशेष ट्रॅफिक व पॉवर ब्लॉक जाहीर केला आहे. त्यामुळे या मार्गावरील काही लोकल फेऱ्या रद्द होणार असून काही गाड्या मर्यादित अंतरापर्यंतच धावणार आहेत.

दुपारी दोन तास सेवा प्रभावित

रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, दररोज दुपारी 3.50 ते सायंकाळी 5.50 या वेळेत कसारा ते इगतपुरी या विभागात ब्लॉक घेण्यात येणार आहे. या कालावधीत आसनगाव ते कसारा दरम्यान लोकल सेवा पूर्णपणे बंद राहणार आहे. प्रवाशांच्या सुरक्षिततेसह रेल्वे पायाभूत सुविधांची देखभाल करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

काही लोकल केवळ आसनगावपर्यंतच

ब्लॉकच्या कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) येथून सुटणाऱ्या कसारा लोकलपैकी N19 (दुपारी 1.10), N21 (दुपारी 2.17) आणि N23 (दुपारी 2.46) या गाड्या कसाराऐवजी फक्त आसनगावपर्यंत धावतील.

परतीच्या प्रवासातही बदल

कसाराहून सीएसएमटीकडे जाणाऱ्या काही लोकलही आसनगावहूनच सुरू होतील. त्यानुसार N24 (दुपारी 4.12), N26 (दुपारी 4.54) आणि N28 (सायंकाळी 5.39) या लोकल आसनगाव स्थानकातून सुटतील.

ब्लॉकपूर्वी आणि ब्लॉकनंतरच्या महत्त्वाच्या फेऱ्या

ब्लॉक सुरू होण्यापूर्वी सीएसएमटीहून कसारासाठी धावणारी N17 ही दुपारी 12.30 वाजताची लोकल शेवटची नियमित फेरी असेल. तर कसाराहून सीएसएमटीकडे जाणारी N22 ही दुपारी 2.42 वाजताची लोकल ब्लॉकपूर्वीची अंतिम सेवा असेल. ब्लॉकनंतर सीएसएमटीहून कसाराकडे जाणारी N25 ही सायंकाळी 4.50 वाजताची लोकल पहिली सेवा असेल. तसेच कसाराहून सीएसएमटीकडे N30 ही सायंकाळी 6.17 वाजता सुटणारी लोकल ब्लॉक संपल्यानंतरची पहिली फेरी असेल.

हेही वाचा – Mumbai Local Mega block : मुंबईच्या तिन्ही मार्गांवर दोन दिवस मेगाब्लॉक; विकेंडप्लॅन करण्यापूर्वी वेळापत्रक पाहा

प्रवाशांना नियोजनाचे आवाहन

चार दिवस चालणाऱ्या या विशेष ब्लॉकमुळे नियमित प्रवाशांच्या वेळापत्रकावर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कसारा-इगतपुरी मार्गावर प्रवास करणाऱ्या नागरिकांनी रेल्वेने जाहीर केलेल्या सुधारित वेळापत्रकाची माहिती घेऊनच प्रवासाचे नियोजन करावे, असे आवाहन मध्य रेल्वेने केले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number