छत्तीसगडमध्ये २९ नक्षलवादी ठार

कांकेर, १६ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : छत्तीसगडमधील कांकेर येथे पोलीस आणि नक्षलवादी यांच्यात चकमक झाली. या चकमकीत २९ नक्षलवादी ठार झाले आहेत. लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याचे मतदान १९ एप्रिल रोजी होणार आहे. हे मतदान होण्याच्या तीन दिवस आधी पोलिसांना नक्षलवाद विरोधी कारवाईत उल्लेखनीय यश मिळाले आहे. पोलिसांनी आतापर्यंत नक्षलवाद्यांचा स्वयंघोषीत कमांडर शंकर राव याच्यासह २९ […]

छत्तीसगडमध्ये २९ नक्षलवादी ठार

कांकेर, १६ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : छत्तीसगडमधील कांकेर येथे पोलीस आणि नक्षलवादी यांच्यात चकमक झाली. या चकमकीत २९ नक्षलवादी ठार झाले आहेत. लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याचे मतदान १९ एप्रिल रोजी होणार आहे. हे मतदान होण्याच्या तीन दिवस आधी पोलिसांना नक्षलवाद विरोधी कारवाईत उल्लेखनीय यश मिळाले आहे. पोलिसांनी आतापर्यंत नक्षलवाद्यांचा स्वयंघोषीत कमांडर शंकर राव याच्यासह २९ नक्षलवाद्यांचे मृतदेह जप्त केले आहेत. चकमकीत तीन पोलीस जखमी झाले आहेत. जखमी पोलिसांवर वैद्यकीय उपचार सुरू आहेत.

शंकर राव या नक्षलवाद्यावर २५ लाखांचे बक्षिस जाहीर करण्यात आले होते. अखेर हा नक्षलवादी पोलीस चकमकीत ठार झाला. पोलिसांनी चकमकीच्या ठिकाणावरून सात एके ४७ रायफल, एक इंसास रायफल आणि तीन एलएमजी (हलक्या वजनाच्या मशीनगन) जप्त केल्या आहेत तसेच इतर शस्त्रसाठा आणि नक्षली साहित्य जप्त केले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number