इकबालसिंह चहल मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव

मुंबई, २२ मार्च २०२४, प्रतिनिधी : इकबालसिंह चहल यांची मुख्यमंत्र्यांच्या अतिरिक्त मुख्य सचिव पदावर नियुक्ती झाली आहे. तर पी. वेलारसू सामाजिक न्याय विभागाचे सचिव झाले. इकबालसिंह चहल याआधी मुंबई महापालिकेचे आयुक्त होते. आचारसंहिता लागू झाल्यानंतर तीन वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त काळ एकाच पदावर असलेल्या प्रशासन आणि पोलीस दलातील अधिकाऱ्यांची निवडणूक आयोगाने सरसकट बदली केली. या […]

इकबालसिंह चहल मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव

मुंबई, २२ मार्च २०२४, प्रतिनिधी : इकबालसिंह चहल यांची मुख्यमंत्र्यांच्या अतिरिक्त मुख्य सचिव पदावर नियुक्ती झाली आहे. तर पी. वेलारसू सामाजिक न्याय विभागाचे सचिव झाले.

इकबालसिंह चहल याआधी मुंबई महापालिकेचे आयुक्त होते. आचारसंहिता लागू झाल्यानंतर तीन वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त काळ एकाच पदावर असलेल्या प्रशासन आणि पोलीस दलातील अधिकाऱ्यांची निवडणूक आयोगाने सरसकट बदली केली. या प्रक्रियेत आयोगाने चहल यांची बदली केली. भूषण गगराणी यांची मुंबई मनपाच्या आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली. यानंतर इकबालसिंह चहल यांची मुख्यमंत्र्यांच्या अतिरिक्त मुख्य सचिव पदावर नियुक्ती झाली.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number