अभिनेत्री संस्कृती बालगुडे च बॉलिवुड पदार्पण ?

सध्या अनेक कलाकार मराठीच्या सोबतीने बॉलिवुड मध्ये आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मन जिंकताना दिसतात. बॉलिवुड गाजवणारी ही मराठी कलाकार मंडळी बॉलिवुड मध्ये स्वतःच वेगळं स्थान निर्माण करत असून बॉलिवुड मध्ये मराठीच नाव मोठं करताना दिसतात. सई ताम्हणकर , अमृता खानविलकर , प्रिया बापट , वैभव तत्ववादी, गिरिजा ओक यांच्या बॉलिवुड पदार्पणा नंतर आता अभिनेत्री संस्कृती बालगुडे […]

अभिनेत्री संस्कृती बालगुडे च बॉलिवुड पदार्पण ?

सध्या अनेक कलाकार मराठीच्या सोबतीने बॉलिवुड मध्ये आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मन जिंकताना दिसतात. बॉलिवुड गाजवणारी ही मराठी कलाकार मंडळी बॉलिवुड मध्ये स्वतःच वेगळं स्थान निर्माण करत असून बॉलिवुड मध्ये मराठीच नाव मोठं करताना दिसतात. सई ताम्हणकर , अमृता खानविलकर , प्रिया बापट , वैभव तत्ववादी, गिरिजा ओक यांच्या बॉलिवुड पदार्पणा नंतर आता अभिनेत्री संस्कृती बालगुडे देखील एका बॉलिवुड प्रोजेक्ट मध्ये दिसणार आहे. हे मराठी कलाकार हिंदी इंडस्ट्रीत अनोख्या अभिनय कौशल्याने चर्चेत आहेत. वैविध्यपूर्ण भूमिका साकारणारे हे मराठी कलाकार हिंदीत चर्चेचा विषय ठरतात.

सई ताम्हणकर : हंटर , मिमी आणि आता ” भक्षक ” सारख्या नावाजलेल्या चित्रपटात काम करून सई ताम्हणकर पुन्हा एकदा बॉलिवुड मध्ये झळकली आहे. आगामी काळात ती अजून एका प्रोजेक्ट मधून बॉलिवुड मध्ये दिसणार आहे.

अमृता खानविलकर : ” लुटेरा ” या आगामी वेब सीरिज मधून अमृता पुन्हा एकदा बॉलिवुड मध्ये जोरदार पदार्पण करणार असून तिने राझी , मलंग सारख्या चित्रपटातून आपल्या अभिनयाची छाप बॉलिवुड मध्ये पाडली होती.

प्रिया बापट : प्रिय ही नेहमीच तिच्या वेगवेगळ्या भूमिका साठी ओळखली जाते आणि रफुचक्कर , सिटी ऑफ ड्रीम्स सारख्या उत्तम बॉलिवुड प्रोजेक्ट मध्ये प्रिया दिसली होती.

संस्कृती बालगुडे : अभिनय , नृत्य आणि अनेक कलांची आवड जोपासणारी अभिनेत्री म्हणून संस्कृती बालगुडे ओळखली जाते. संस्कृती लवकरच एका बॉलिवुड प्रोजेक्ट मध्ये दिसणार आहे. बॉलिवुड अभिनेता शारिब हाश्मी सोबत ती या हिंदी- इंग्रजी प्रोजेक्ट मध्ये दिसणार आहे. हा बॉलिवुड प्रोजेक्ट नक्की काय असणार आहे कोणा सोबत असणार आहे या बद्दल काही समजलं नसल तरी लवकरच या बद्दल ती अधिकृत माहिती देणार असल्याचं कळतंय. संस्कृती बालगुडे ही कायम फॅशन , नृत्य आणि तिच्या अभिनयासाठी चर्चेत असते आणि आता ती बॉलिवुड मध्ये सुद्धा पदार्पण करणार आहे.

वैभव तत्ववादी : आर्टिकल ३७० मधून वैभव ने पुन्हा एकदा बॉलिवुड मध्ये दमदार पदार्पण केलं आणि प्रेक्षकांना आपलंसं केलं. त्याच्या अभिनयाचं सर्वत्र कौतुक देखील झालं. बाजीराव मस्तानी , हंटर , लिपस्टिक अंडर माय बुरखा अश्या अनेक बॉलिवुड प्रोजेक्ट्स मधून वैभव दिसला.

मराठी कलाकारांनी बॉलिवुड मध्ये आपल्या अभिनयाची छाप पाडण हे नक्कीच कौतुकस्पद आहे. येणाऱ्या काळात अजून कोण कलाकार बॉलिवुड मध्ये झळकणार हे बघण उत्सुकतेच ठरणार आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number