भांडुपमध्ये वर्षभरात होणार फ्लेमिंगो पार्क

मुंबई, १६ मार्च २०२४, प्रतिनिधी :  भांडुप पंपिंग स्टेशन येथील प्रस्तावित फ्लेमिंगो पार्कला केंद्र सरकारच्या संबंधित विभागाची मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे हे पार्क तसेच हा परिसर पर्यटन स्थळ म्हणून विकसित करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. पूर्व उपनगरातील हे पहिले फ्लेमिंगो पार्क ठरणार आहे. केंद्र सरकारच्या अमृत तसेच मिष्टी या योजनांच्या आधारे फ्लेमिंगो पार्कची संकल्पना या […]

भांडुपमध्ये वर्षभरात होणार फ्लेमिंगो पार्क

मुंबई, १६ मार्च २०२४, प्रतिनिधी :  भांडुप पंपिंग स्टेशन येथील प्रस्तावित फ्लेमिंगो पार्कला केंद्र सरकारच्या संबंधित विभागाची मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे हे पार्क तसेच हा परिसर पर्यटन स्थळ म्हणून विकसित करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. पूर्व उपनगरातील हे पहिले फ्लेमिंगो पार्क ठरणार आहे. केंद्र सरकारच्या अमृत तसेच मिष्टी या योजनांच्या आधारे फ्लेमिंगो पार्कची संकल्पना या ठिकाणी राबवण्यात येत आहे. या पार्कमुळे पर्यटकांच्या संख्येत लक्षणीय वाढ होईल आणि भुमिपुत्रांसाठी मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण होईल. पुढील वर्षभरात एक सुसज्ज फ्लेमिंगो पार्क मुंबईकराच्या सेवेत दाखल होईल, असे खासदार मनोज कोटक म्हणाले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number