मुंबई विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात विद्यार्थ्यांचा सन्मान

मुंबई, ७ मार्च २०२४, प्रतिनिधी : मुंबई विद्यापीठाच्या जनसंज्ञापन आणि पत्रकारिता विभागाचा दीक्षांत समारंभ आज पार पडला. मुंबई विद्यापीठाच्या कलिना संकुलातील फिरोजशहा मेहता भवन येथे हा सोहळा पार पडला. जनसंज्ञापन आणि पत्रकारिता विभागाचे प्रमुख डॉ. सुंदर राजदीप यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी २०२० – २०२२ आणि २०२१- २०२३ या शैक्षणिक वर्षातील […]

मुंबई विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात विद्यार्थ्यांचा सन्मान

मुंबई, ७ मार्च २०२४, प्रतिनिधी : मुंबई विद्यापीठाच्या जनसंज्ञापन आणि पत्रकारिता विभागाचा दीक्षांत समारंभ आज पार पडला. मुंबई विद्यापीठाच्या कलिना संकुलातील फिरोजशहा मेहता भवन येथे हा सोहळा पार पडला. जनसंज्ञापन आणि पत्रकारिता विभागाचे प्रमुख डॉ. सुंदर राजदीप यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी २०२० – २०२२ आणि २०२१- २०२३ या शैक्षणिक वर्षातील विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली. या कार्यक्रमास जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीचे संपादक प्रसाद काथे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. चित्रपट- मालिका निर्माते नितीन वैद्य आणि पत्रकार अलका धुपकर हे सुद्धा प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पत्रकारिता क्षेत्रातील पदव्युत्तर पदवी आणि पीएचडी धारकांना पदवी प्रमाणपत्र देण्यात आले. यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांना पत्रकारिता क्षेत्रातील रोजगाराच्या संधी याविषयी नितीन वैद्य आणि सुंदर राजदीप यांनी मार्गदर्शन केले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number