मुंबई, ६ मार्च २०२४, प्रतिनिधी : वांद्रे-कुर्ला संकुलातील (बीकेसी) कर्मचाऱ्यांच्या सेवेसाठी तसेच मुंबई नगरीत आंतरराष्ट्रीय सेवा सुविधांची उभारणी करण्याच्या दृष्टीने वांद्रे रेल्वे स्थानक ते कुर्ला रेल्वे स्थानकादरम्यान पॉड टॅक्सीसेवा सुरू होणार आहे. याप्रकारच्या अत्याधुनिक सेवेला व त्यासाठीच्या १०१६.३८ कोटी रुपये खर्चाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) अर्थसंकल्पीय १५६व्या बैठकीत मंजुरी दिली.
बीकेसीत आता पॉड टॅक्सी
एमएमआरडीएच्या बैठकीत निर्णय
पॉड टॅक्सी चालकविरहित वाहतुकीचं साधन
वेगवान प्रवासी वाहतुकीसाठी नवा पर्याय
मुख्यमंत्री शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झालेल्या या बैठकीत ‘बीकेसी’त भक्कम सार्वजनिक वाहतूक व्यवस्था उभी करण्यासाठी पॉड टॅक्सीचा विचार करण्यात आला आहे. यासाठी सल्लागारामार्फत तयार करण्यात आलेल्या स्वयंचलित सार्वजनिक जलद वाहतूक प्रणालीच्या तांत्रिक व वित्तीय सुसाध्यता अहवालास प्राधिकरणाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. त्यानुसार ‘बीकेसी’मध्ये स्वयंचलित जलद सार्वजनिक वाहतूक परिवहन प्रणाली सार्वजनिक-खासगी-भागीदारी तत्त्वावर अंमलबजावणी करण्यासाठीच्या खर्चालाही मंजुरी देण्यात आली आहे. त्यानंतर आता लवकरच या कामासाठी आवश्यक असणाऱ्या स्वतंत्र अभियंता संस्थेची नियुक्ती करण्यासाठी निविदा प्रक्रिया सुरू करण्यात येणार असल्याचे ‘एमएमआरडीए’ने म्हटले आहे. ‘बीकेसी’चा जागतिक स्तर आणखी उंचावण्याच्या दृष्टीने तसेच वांद्रे व कुर्ला या रेल्वे स्थानकांच्या शक्य तितक्या जवळ जोडणी करण्याच्या दृष्टीने ही सेवा तिथे ‘एमएमआरडीए’च्या माध्यमातून उभी केली जाणार आहे. त्यामुळेच या सेवेला ‘स्वयंचलित जलद सार्वजनिक वाहतूक परिवहन प्रणाली’ असे संबोधले जाते. प्रवाशांना जलदरित्या एका स्थळावरून दुसरीकडे ने-आण करण्यासाठीची ही सेवा असेल. त्यामध्ये वांद्रे व कुर्ला ही रेल्वे स्थानके बीकेसीमार्फत एकमेकांना जोडली जाणार आहेत.
पॉड टॅक्सी म्हणजे काय ?
पॉड टॅक्सी हे वीजेवर चालणारं वाहन
पॉड टॅक्सी चालकविरहित वाहतुकीचं साधन
वेगवान प्रवासी वाहतुकीसाठी नवा पर्याय
पॉड टॅक्सीची वैशिष्ट्ये काय ?
पॉड टॅक्सी हे ६ आसनी स्वयंचलित वाहन
सरासरी गती प्रती ताशी ६० किमी
केबल कार म्हणून पॉड टॅक्सी परिचित
वाहक विरहित वाहन
प्रवाशांच्या इच्छेनुसार प्रवासाची मुभा
पॉड टॅक्सी प्रकल्प नेमका काय ?
वांद्रे ते कुर्ला स्थानकादरम्यान ‘पॉड टॅक्सी’ धावणार
या मार्गाची लांबी ८. ८० किलोमीटर एवढी आहे.
त्यामध्ये ३८ स्थानके असणार आहेत.
प्रति पॉड सहा प्रवासी एवढी त्याची क्षमता आहे.
कमाल ४० किमी प्रति तास एवढा त्याचा वेग असणार
प्रकल्पामुळे वांद्रे स्थानक ते बीकेसी प्रवास अधिक सुलभ होणार
पॉड टॅक्सी प्रकल्पासाठी १०१६ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.
या प्रकल्पासाठी सुमारे तीन वर्षे लागतील.
२०३१ पर्यंत २ लाख नागरिक पॉड टॅक्सीचा वापर करु शकतील.
यासाठी प्रति किलोमीटर प्रवास खर्च अंदाजे २१ रुपये येऊ शकतो.
कसा असेल मार्ग?
पॉड टॅक्सी कुर्ला रेल्वे स्टेशनवरून मिठी नदी ओलांडून बीकेसीत शिरेल
महत्त्वाच्या कंपन्यांच्या जवळून कलानगर येथे पोहोचेल.
त्यानंतर पश्चिम रेल्वेच्या वांद्रे रेल्वे स्टेशनला पोहोचेल.
बीकेसी हे मुंबईतील आर्थिक केंद्रबिंदू आहे.
त्यामुळे या प्रकल्पाचा लाभ नागरिकांना मोठ्या प्रमाणात होईल.