मुंबईतील १५ हजार झोपड्यांच्या पुनर्विकास करणार

मुंबई, ५ मार्च २०२४, प्रतिनिधी : माता रमाबाई आंबेडकर नगर आणि कामराज नगर येथील सुमारे १५ हजार झोपड्यांच्या पुनर्विकास करण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण आणि झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरण यांच्यात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत संयुक्त करार करण्यात आला. मंत्रालयात झालेल्या एमएमआरडीएच्या बैठकीत हा करार झाला. यावेळी अन्य महत्वांच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांबरोबरच वांद्रे कुर्ला संकुलात स्वयंचलित जलद सार्वजनिक […]

मुंबईतील १५ हजार झोपड्यांच्या पुनर्विकास करणार

मुंबई, ५ मार्च २०२४, प्रतिनिधी : माता रमाबाई आंबेडकर नगर आणि कामराज नगर येथील सुमारे १५ हजार झोपड्यांच्या पुनर्विकास करण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण आणि झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरण यांच्यात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत संयुक्त करार करण्यात आला. मंत्रालयात झालेल्या एमएमआरडीएच्या बैठकीत हा करार झाला. यावेळी अन्य महत्वांच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांबरोबरच वांद्रे कुर्ला संकुलात स्वयंचलित जलद सार्वजनिक वाहतूक परिवहन (पॉड टॅक्सी) प्रकल्प सार्वजनिक खासगी भागीदारी तत्वावर करण्यास मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली. मुंबई महापालिकेप्रमाणेच एमएमआरडीक्षेत्रातही डीप क्लिन ड्राईव्ह घेण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.

पॉड टॅक्सी सेवा

वांद्रे ते कुर्ला स्थानका दरम्यान वांद्रे कुर्ला संकुलामधून पॉड टॅक्सी धावणार असून त्याची लांबी ८.८० कीमी एवढी आहे. त्यामध्ये ३८ स्थानके असणार आहेत. प्रति पॉड सहा प्रवाशी एवढी त्याची क्षमता आहे. कमाल ४० किमी प्रति तास एवढा त्याचा वेग असणार आहे, हा प्रकल्प सार्वजनिक खासगी भागिदारी तत्वावर सुरू करण्यास मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली.

झोपडपट्टी मुक्त ठाणे

ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील ठाणे परिवहन सेवा यांच्या मालकीच्या बस डेपोसाठीच्या जागांवर अत्याधुनिक बस डेपोचा विकास व सभोवतालच्या शासकीय जमिनीवरील झोपडपट्टयांचे पुनर्वसन करुन उपलब्ध होणाऱ्या मोकळया शासकीय जमिनीचा विकास प्राधिकरणामार्फत करण्यास आजच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. यामुळे झोपडपट्ट्यांचे पुनर्वसन होणार असून ठाणे शहर झोपडपट्टी मुक्त करण्याच्या प्रयत्नांना चालना मिळणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

बाळकूम ते गायमुख ठाणे खाडी किनारा मार्गाचे काम (ठाणे कोस्टल रोड), पूर्व मुक्त मार्गाचे छेडानगर, घाटकोपर ते ठाणे पर्यंत विस्तारीकरण प्रकल्प, पूर्व द्रुतगती महामार्गावर ठाणे शहरातील आनंद नगर ते साकेत पर्यंतच्या ८.२५ कि.मी. लांबीच्या उन्नत मार्गाचे काम, कासारवडवली ठाणे ते खारबाव भिवंडी प्रकल्प, विस्तारीत मुंबई नागरी पायाभूत सुविधा प्रकल्पांतर्गत (Extened MUIP) ऐरोली बोगदा ते कटाई नाका, गायमुख ते पायेगाव दरम्यान खाडीपुलाचे काम, कल्याण बाह्यवळण रस्ता भाग ८ च्या (रुंदे रस्ता ते गोवेली रस्ता) बांधकाम या सर्व प्रकल्पांना सुधारीत प्रशासकीय मान्यता यावेळी देण्यात आली.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number