‘व्यसनं घरापर्यंत येतायत, दुर्लक्ष करु नका’

मुंबई, २८ फेब्रुवारी २०२४, प्रतिनिधी : व्यसनं घरापर्यंत येतायत, दुर्लक्ष करु नका, असे आवाहन पिट्यादादा फेम मराठी चित्रपट कलाकार रमेश परदेशी यांनी ‘जय महाराष्ट्र’च्या लक्षवेधीतून नागरिकांना केले. खोडसाळ यूट्युबर आणि ड्रग्जचे साथीदार यांच्यामुळे रमेश परदेशी अडचणीत आल्याची चर्चा आहे. नशेत असणाऱ्यांना मदत करणे किंवा नशा करणाऱ्यांच्या विरोधात बोलणे हेच चुकीचे ठरणार असेल तर आपण कोणत्या […]

‘व्यसनं घरापर्यंत येतायत, दुर्लक्ष करु नका’

मुंबई, २८ फेब्रुवारी २०२४, प्रतिनिधी : व्यसनं घरापर्यंत येतायत, दुर्लक्ष करु नका, असे आवाहन पिट्यादादा फेम मराठी चित्रपट कलाकार रमेश परदेशी यांनी ‘जय महाराष्ट्र’च्या लक्षवेधीतून नागरिकांना केले. खोडसाळ यूट्युबर आणि ड्रग्जचे साथीदार यांच्यामुळे रमेश परदेशी अडचणीत आल्याची चर्चा आहे.

नशेत असणाऱ्यांना मदत करणे किंवा नशा करणाऱ्यांच्या विरोधात बोलणे हेच चुकीचे ठरणार असेल तर आपण कोणत्या दिशेने जात आहोत आणि ते योग्य आहे का हा प्रश्न या निमित्ताने चर्चेत आला आहे. कायदेतज्ज्ञांच्या मते मुलींचा चेहरा दाखवणे हे चुकीचे असले तरी त्यामागील हेतू न्यायालयापुढे सिद्ध करणे शक्य झाले तर रमेश परदेशी यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

नेमके काय घडले ?

काही दिवसांपूर्वी पुण्यात रस्त्यावर दोन अल्पवयीन मुली नशेत आढळल्या होत्या. या मुलींना सावण्यासाठी मदत देऊ करणाऱ्या पिट्यादादानं एक व्हिडीओ केला होता. या व्हिडीओत रस्त्याच्या कडेला नशेत असलेल्या दोन्ही मुली दिसत आहेत. मुली आईवडिलांकडून मिळालेल्या पैशांचा नशेसाठी वापर करत असतील तर त्यांना थांबवणे आवश्यक आहे. पालकांनी यासाठी खबरदारी घेणे आवश्यक आहे, असे मतप्रदर्शन रमेश परदेशी यांनी केले. पण हा व्हिडीओ रमेश परदेशी यांच्यासाठी अडचणीचा ठरला आहे.

समाजमाध्यमांत पोस्ट केलेला व्हिडीओ त्यांनी काही मिनिटांनी मुलींचा चेहरा दिसत असल्याची जाणीव होताच डीलीट केला. पण तोपर्यंत काही यूट्युबरनी आणि डिजिटल माध्यमांनी हा व्हिडीओ डाऊनलोड करून वापरला. यानंतर मूळ व्हिडीओ रमेश परदेशी यांनी तयार केला असल्यामुळे त्यांच्या विरोधात तक्रार दाखल झाली. प्रकरण महिला आयोगाकडे गेले. काय खावे – प्यावे हा वैयक्तिक स्वातंत्र्याचा भाग आहे त्यामुळे कोणी नशा केली असली तरी त्यावर व्हिडीओ करून वैयक्तिक स्वातंत्र्याला बाधा आणण्याचा प्रकार झाला आहे, अशा स्वरुपाची तक्रार आयोगाकडे करण्यात आली. तक्रारीमुळे पिट्यादादा फेम मराठी चित्रपट कलाकार रमेश परदेशी अडचणीत सापडले आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number