पोरबंदरजवळ ३३०० किलो ड्रग्ज, ५ अटकेत

पोरबंदर, २८ फेब्रुवारी २०२४, प्रतिनिधी : गुजरात एटीएस, एनसीबी आणि भारतीय नौदल यांनी संयुक्त कारवाई करून पोरबंदरजवळ समुद्रात ड्रग्ज तस्करांवर कारवाई केली. या कारवाईत सुमारे ३३०० किलो ड्रग्ज जप्त करण्यात आले आणि पाच परदेशी तस्करांना अटक करण्यात आले. एकूण ३०८९ किलो चरस, १५८ किलो मेथॅम्फेटामाइन, २५ किलो मॉर्फिन जप्त करण्यात आले. जप्त केलेल्या ड्रग्जची आंतरराष्ट्रीय […]

पोरबंदरजवळ ३३०० किलो ड्रग्ज, ५ अटकेत

पोरबंदर, २८ फेब्रुवारी २०२४, प्रतिनिधी : गुजरात एटीएस, एनसीबी आणि भारतीय नौदल यांनी संयुक्त कारवाई करून पोरबंदरजवळ समुद्रात ड्रग्ज तस्करांवर कारवाई केली. या कारवाईत सुमारे ३३०० किलो ड्रग्ज जप्त करण्यात आले आणि पाच परदेशी तस्करांना अटक करण्यात आले. एकूण ३०८९ किलो चरस, १५८ किलो मेथॅम्फेटामाइन, २५ किलो मॉर्फिन जप्त करण्यात आले. जप्त केलेल्या ड्रग्जची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत दोन हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. समुद्रात जप्त केलेला भारतातला सर्वात मोठा ड्रग्जचा साठा असे पोरबंदर जवळच्या ताज्या कारवाईचे थोडक्यात वर्णन करता येईल.

काही दिवसांपूर्वी सोमनाथ पोलिसांनी वेरावळ शहराजवळ घाटानजीक वाहून आलेले ३५० कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त केले होते. या प्रकरणात नऊ जणांना अटक करण्यात आली. यानंतर केंद्रीय यंत्रणा सतर्क झाल्या. गुप्तचरांच्या मदतीने ड्रग्ज तस्करांच्या हालचालींची माहिती घेण्यास सुरुवात झाली. ठोस माहिती मिळताच पोरबंदर जवळ समुद्रात संयुक्त पथकाने कारवाई केली आणि सुमारे ३३०० किलो ड्रग्ज जप्त केले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number