…म्हणून सिसोदियांना जामीन

नवी दिल्ली, १२ फेब्रुवारी २०२४, प्रतिनिधी : मद्यविक्री घोटाळ्यात न्यायालयीन कोठडीत असलेल्या आम आदमी पार्टीच्या मनिष सिसोदिया यांना दिल्लीच्या राउस अॅव्हेन्यू न्यायदंडाधिकाऱ्यांनी तीन दिवसांचा जामीन दिला आहे. जवळच्या नात्यात लग्न असल्यामुळे सिसोदिया यांना १३ ते १५ फेब्रुवारी या काळासाठी जामीन देण्यात आला आहे. जामिनाचा कालावधी संपताच मनिष सिसोदिया यांना पुन्हा न्यायालयीन कोठडीसाठी दिल्लीच्या तिहार तुरुंग […]

…म्हणून सिसोदियांना जामीन

नवी दिल्ली, १२ फेब्रुवारी २०२४, प्रतिनिधी : मद्यविक्री घोटाळ्यात न्यायालयीन कोठडीत असलेल्या आम आदमी पार्टीच्या मनिष सिसोदिया यांना दिल्लीच्या राउस अॅव्हेन्यू न्यायदंडाधिकाऱ्यांनी तीन दिवसांचा जामीन दिला आहे. जवळच्या नात्यात लग्न असल्यामुळे सिसोदिया यांना १३ ते १५ फेब्रुवारी या काळासाठी जामीन देण्यात आला आहे. जामिनाचा कालावधी संपताच मनिष सिसोदिया यांना पुन्हा न्यायालयीन कोठडीसाठी दिल्लीच्या तिहार तुरुंग प्रशासनापुढे हजर व्हावे लागेल. याआधी पत्नी आजारी होती म्हणून मनिष सिसोदिया यांना ११ नोव्हेंबर २०२३ रोजी सकाळी दहा ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत जामीन देण्यात आला होता.

सिसोदियांसोबत पोलीस नसणार

लग्न सोहळ्यासाठी जामीन देत असल्यामुळे या कालावधीत सिसोदिया यांच्यासोबत पोलीस उपस्थित नसतील. पण जामिनाचा कालावधी संपताच पुन्हा तुरुंगात हजर होण्याचे बंधन सिसोदिया यांना घालण्यात आले आहे.

सीबीआयच्या वकिलाने केला विरोध

सिसोदिया यांना लग्न सोहळ्यासाठी तीन दिवसांचा जामीन देण्यास सीबीआयच्या वकिलाने विरोध केला. पण जवळच्या नात्यातले लग्न असल्यामुळे न्यायदंडाधिकाऱ्यांनी सिसोदिया यांना १३ ते १५ फेब्रुवारी या काळासाठी जामीन दिला आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number