मुंबई, ९ फेब्रुवारी २०२४, प्रतिनिधी : उद्धव समर्थक माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची हत्या झाली. स्थानिक गुंड मॉरिस याने अभिषेकवर गोळीबार केला, नंतर आत्महत्या केली. या प्रकरणात पोलिसांनी घटनास्थळावरून १ पिस्तुल आणि २ जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. चौकशीसाठी पोलिसांनी मॉरिसचा खासगी सचिव (पीए) मेहुल पारीख याला ताब्यात घेतले आहे. मेहुल व्यतिरिक्त पोलिसांनी रोहित साहू नावाच्या तरुणाला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. रोहित साहू हा मॉरिसचा अंगरक्षक होता असे समजते.