…म्हणून झाली अभिषेक घोसाळकरांची हत्या

मुंबई, ९ फेब्रुवारी २०२४, प्रतिनिधी : वैयक्तिक वैमनस्यातून मॉरिसने उद्धव गटाच्या अभिषेक घोसाळकर यांची हत्या केली. यानंतर मॉरिसने आत्महत्या केली. या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. मॉरिसकडे शस्त्र कसे आले याची पण चौकशी सुरू आहे. या प्रकरणात वेगवेगळी माहिती पुढे येत आहे. चौकशीतून सत्य कळेल. हे सत्य उलगडेपर्यंत संयम राखणे आवश्यक आहे. घडलेली घटना अत्यंत दु:खद […]

…म्हणून झाली अभिषेक घोसाळकरांची हत्या

मुंबई, ९ फेब्रुवारी २०२४, प्रतिनिधी : वैयक्तिक वैमनस्यातून मॉरिसने उद्धव गटाच्या अभिषेक घोसाळकर यांची हत्या केली. यानंतर मॉरिसने आत्महत्या केली. या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. मॉरिसकडे शस्त्र कसे आले याची पण चौकशी सुरू आहे. या प्रकरणात वेगवेगळी माहिती पुढे येत आहे. चौकशीतून सत्य कळेल. हे सत्य उलगडेपर्यंत संयम राखणे आवश्यक आहे. घडलेली घटना अत्यंत दु:खद आहे. युवा नेत्याचं अशा प्रकारे निधन व्हावं हे अतिशय गंभीर आहे. या प्रकरणाला काही जण राजकीय रंग देण्याचा प्रयत्न करत आहेत हे योग्य नाही, असे राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

मॉरिस आणि अभिषेक घोसाळकर यांचे २०२४ मध्येही एकत्र फोटो आहेत. त्यांनी अनेक वर्षे एकत्र काम केले आहे. यामुळे नेमक्या कोणत्या विषयावरून त्यांच्यात वाद झाला. मॉरिसच्या कृतीमागचे नेमके कारण काय, याची चौकशी सुरू आहे; अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

गुरुवारी ८ फेब्रुवारी रोजी मॉरिसने एक फेसबुक लाईव्ह केले. या एफबी लाईव्ह दरम्यान त्याने अभिषेक घोसाळकर यांना शेजारी बसवले होते. दोघांनी वाद मिटला आहे आणि एकत्र काम करणार असे जाहीर केले. यानंतर अभिषेक यांना बोलायला सांगून मॉरिस बाजूला गेला. अभिषेक यांचे बोलणे संपले आणि ते उठून उभे राहिले त्यावेळी समोरून मॉरिसने गोळ्या झाडल्या. अभिषेक घोसाळकर यांची हत्या केल्यानंतर मॉरिसने आत्महत्या केली.

कोण होते अभिषेक घोसाळकर ?

उद्धव ठाकरे यांच्या गटाचे सदस्य
दोन वेळा मुंबई महापालिकेचे नगरसेवक
दहिसरच्या कांदरपाडा प्रभाग क्रमांक सातचे नगरसेवक
माजी आमदार विनोद घोसाळकर यांचा मुलगा
अभिषेक घोसाळकर यांची पत्नी तेजस्वी घोसाळकर प्रभाग क्रमांक एकची नगरसेविका

मॉरिसची इन्स्टा पोस्ट

माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर आणि मॉरिस यांच्यात वाद होते. मॉरिसला एका गु्न्ह्यात तुरुंगवास घडला. अभिषेक यांच्यामुळेच तुरुंगात जावे लागल्याचा संशय मॉरिसला होता. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर मॉरिसने पुन्हा अभिषेक यांच्याशी मैत्री केली. आयसी कॉलनीतील स्वत:च्या कार्यालयात बोलावलं. साडी वाटप कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आमंत्रण दिले. आता एकत्र काम करू असे मॉरिसने अभिषेक यांच्यासोबत फेसबुक लाईव्ह करून जाहीर केले. यानंतर अभिषेक यांना बोलायला सांगून मॉरिस बाजूला गेला.एकत्र येण्यामागची भूमिका सांगून अभिषेक सोफ्यावर उठले. त्यावेळी मॉरिसनं त्यांच्यावर समोरुन ५ गोळ्या झाडल्या. अभिषेक यांची हत्या केल्यानंतर मॉरिसने आत्महत्या केली. फेसबुक लाईव्ह सुरू असताना मॉरिस ठरवून बाजूला गेला. यामुळे त्याने हत्येचा कट विचार करून तयार केल्याची सक्यता व्यक्त होत आहे. याआधी २९ जानेवारी रोजी मॉरिसने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट केली होती. ‘वेदना, नुकसान, अनादर, नकार यांची फिकीर नसलेल्या माणसाला तुम्ही पराभूत करू शकत नाही,’ असे पोस्टमध्ये नमूद होते.

कोण होता मॉरिस ?

बोरिवली, दहिसर भागात मॉरिस नोरोन्हा हा मॉरिस भाई या नावाने ओळखला जात होता. स्वयंघोषित समाजसेवक असलेल्या मॉरिसला राजकारणात येण्याची इच्छा होती. त्याला उद्धव ठाकरे यांच्या गटात प्रवेश करायचा होता. मॉरिस आणि अभिषेक यांच्यात बऱ्याच कालावधीपासून वैमनस्य होतं.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number