मुंबई, ७ फेब्रुवारी २०२४, प्रतिनिधी : कस्टम्स अर्थात सीमाशुल्क विभागाने मुंबईच्या विमानतळावर ६.३३ किलो सोनं पकडलं. या सोन्याची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत ३.४९ कोटी रुपये आहे. वेगवेगळ्या पाच प्रकरणांमध्ये केलेल्या कारवाईतून हे सोनं जप्त करण्यात आलं. तस्करांनी सोनं लपविण्यासाठी वेगवेगळे प्रयोग केले होते. शरीरात लपवून तसेच कपड्यांमध्ये, मोबाईलच्या चार्जरमध्ये, पर्समध्ये, हेअर ड्रायरमध्ये बॅगांच्या कोपऱ्यांमध्ये लपवून सोन्याची […]
मुंबई, ७ फेब्रुवारी २०२४, प्रतिनिधी : कस्टम्स अर्थात सीमाशुल्क विभागाने मुंबईच्या विमानतळावर ६.३३ किलो सोनं पकडलं. या सोन्याची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत ३.४९ कोटी रुपये आहे. वेगवेगळ्या पाच प्रकरणांमध्ये केलेल्या कारवाईतून हे सोनं जप्त करण्यात आलं. तस्करांनी सोनं लपविण्यासाठी वेगवेगळे प्रयोग केले होते. शरीरात लपवून तसेच कपड्यांमध्ये, मोबाईलच्या चार्जरमध्ये, पर्समध्ये, हेअर ड्रायरमध्ये बॅगांच्या कोपऱ्यांमध्ये लपवून सोन्याची तस्करी करण्याचा प्रयत्न करण्यात आला. या प्रकरणांमध्ये पाच जणांना पकडण्यात आले.