‘उल्फा – आय’च्या म्यानमारमधील तळावर हल्ला

नेपिडो, ८ जानेवारी २०२४, प्रतिनिधी : बंदी घातलेल्या युनायटेड लिबरेशन फ्रंट ऑफ असोम-इंडिपेंडेंट अर्थात उल्फा – आय या दहशतवादी संघटनेने म्यानमारमधील त्यांच्या तळावर ड्रोनद्वारे हल्ले झाल्याचा दावा केला. या हल्ल्यात दोन जण जखमी झाले असेही संघटनेकडून सांगण्यात आले. रविवारी संध्याकाळी ४.१०, ४.१२ आणि ४.२० वाजता ड्रोनद्वारे हल्ला झाला. तिसऱ्या हल्ल्यात स्फोट झाला नाही पण पहिल्या […]

‘उल्फा – आय’च्या म्यानमारमधील तळावर हल्ला

नेपिडो, ८ जानेवारी २०२४, प्रतिनिधी : बंदी घातलेल्या युनायटेड लिबरेशन फ्रंट ऑफ असोम-इंडिपेंडेंट अर्थात उल्फा – आय या दहशतवादी संघटनेने म्यानमारमधील त्यांच्या तळावर ड्रोनद्वारे हल्ले झाल्याचा दावा केला. या हल्ल्यात दोन जण जखमी झाले असेही संघटनेकडून सांगण्यात आले. रविवारी संध्याकाळी ४.१०, ४.१२ आणि ४.२० वाजता ड्रोनद्वारे हल्ला झाला. तिसऱ्या हल्ल्यात स्फोट झाला नाही पण पहिल्या दोन हल्ल्यात स्फोट झाले, असे दहशतवादी संघटनेने सांगितले. हे हल्ले कोणी केले हे अद्याप समजलेले नाही.

उल्फाचे दोन गट आहेत. यापैकी अरबिंदा राजखोवा यांच्या नेतृत्वातील उल्फाच्या गटाने आसाम सरकार आणि भारत सरकार यांच्यासोबतच्या २९ डिसेंबर २०२३ रोजी शांतता करारावर स्वाक्षरी केली आणि शस्त्रे खाली ठेवली. पण परेश बरुआच्या नेतृत्वातील उल्फाच्या गटाने भारतविरोधी हिंसाचार सुरू ठेवला. आता परेशच्या उल्फा गटाने ड्रोन स्वतःच्या तळावर ड्रोन हल्ला झाल्याचा दावा केला आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number