मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक होण्याची शक्यता

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता आहे. मद्य घोटाळ्याप्रकरणी केजरीवाल यांना ईडीने तिसऱ्यांदा समन्स बजावल्यानंतर त्यांनी चौकशीसाठी जाण्यास नकार दिला आहे. त्यामुळे लवकरच मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक होऊ शकते, असा अंदाज आदमी पक्षाच्या नेत्यांनी लावला आहे. दरम्यान, ईडीची टीम गुरुवारी सकाळी मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या निवासस्थानी पोहोचून त्यांना अटक करू शकते. असे […]

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक होण्याची शक्यता

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता आहे. मद्य घोटाळ्याप्रकरणी केजरीवाल यांना ईडीने तिसऱ्यांदा समन्स बजावल्यानंतर त्यांनी चौकशीसाठी जाण्यास नकार दिला आहे. त्यामुळे लवकरच मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक होऊ शकते, असा अंदाज आदमी पक्षाच्या नेत्यांनी लावला आहे. दरम्यान, ईडीची टीम गुरुवारी सकाळी मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या निवासस्थानी पोहोचून त्यांना अटक करू शकते. असे म्हटले आहे.

आम आदमी पक्षाच्या नेत्यांनी एकामागून एक ट्वीट करत केजरीवाल यांच्या घरी ईडीची छापेमारी आणि त्यांच्या अटकेचा अंदाज लावला आहे. दिल्लीचे मंत्री सौरभ भारद्वाज यांनी देखील ट्वीट करत सोशल मिडीया अकाऊंट वरून पोस्ट केली आहे. राज्यसभा खासदार आणि आप नेते संदीप पाठक यांनी देखील पोस्ट करत मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर उद्या सकाळी ईडीकडून छापा टाकण्याची शक्यता असल्याचे म्हटले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number