मुख्यमंत्री आणि जरांगे यांच्यात व्हिडीओ कॉन्फरन्स

मुंबई, २ जानेवारी २०२४, प्रतिनिधी : मराठा आरक्षणाच्या मुद्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे पाटील यांच्यात व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे चर्चा झाली. ज्या मराठ्यांच्या वंशावळीत कुणबी असल्याच्या नोंदी आढळल्या आहेत त्या मराठ्यांना मागितल्यास कुणबी हे प्रमाणपत्र दिले जात आहे. मराठा समाजाला कायद्याच्या चौकटीत टिकणारे आरक्षण देण्यास राज्य शासन सकारात्मक आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. क्युरेटिव्ह […]

मुख्यमंत्री आणि जरांगे यांच्यात व्हिडीओ कॉन्फरन्स

मुंबई, २ जानेवारी २०२४, प्रतिनिधी : मराठा आरक्षणाच्या मुद्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे पाटील यांच्यात व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे चर्चा झाली. ज्या मराठ्यांच्या वंशावळीत कुणबी असल्याच्या नोंदी आढळल्या आहेत त्या मराठ्यांना मागितल्यास कुणबी हे प्रमाणपत्र दिले जात आहे. मराठा समाजाला कायद्याच्या चौकटीत टिकणारे आरक्षण देण्यास राज्य शासन सकारात्मक आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. क्युरेटिव्ह पीटिशन अर्थात पुनर्विचार याचिकेवर २४ जानेवारी २०२४ रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे, हे पण मुख्यमंत्र्यांनी सांगितले. तर सरसकट सर्व मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्यावे अशी मागणी मनोज जरांगेंनी केली.

मराठ्यांच्या उर्दू भाषेतील कुणबी नोंदींची तपासणी करण्याचे काम करण्यासाठी तज्ज्ञांची मदत घेण्याचे नियोजन सुरू आहे. तेलंगणा सरकारशी चर्चा करून हैदराबाद संस्थानमधील मराठ्यांच्या नोंदी तपासण्याचे काम वेगाने करण्याचे नियोजन सुरू आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले. पण ही कायदेशीर प्रक्रिया आहे आणि याला लागणारा वेळ लक्षात घेऊन आंदोलकांनी संयम पाळावा तसेच कायद्याचे पालन करावे आणि सुव्यवस्था राखावी; असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

याआधी मुख्यमंत्री शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मराठा आरक्षणासंदर्भात मराठा आरक्षण आणि सुविधा मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक मुंबईत सह्याद्री अतिथीगृह येथे झाली. या बैठकीस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील, समितीचे सदस्य मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, गिरीश महाजन, दिलीप वळसे – पाटील, शंभूराज देसाई, निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे, निवृत्त न्यायमूर्ती मारोती गायकवाड, विविध विभागांचे सचिव त्याचप्रमाणे विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी हे उपस्थित आहेत. यातील काही सरकारी अधिकारी व्हिडीओ कॉन्फरन्स अर्थात दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते. या बैठकीची माहिती पण जरांगेंना देण्यात आली.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number