‘अमळनेरच्या साहित्य संमेलनाला सर्वोतोपरी पाठबळ देणार’

मुंबई, २७ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी : ‘साने गुरूजी यांचे शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जयंती वर्ष आहे. या निमित्ताने त्यांची कर्मभूमी असलेल्या अमळनेरमध्ये ९७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत आहे, याचा आनंद आहे. हे संमेलन खानदेशच्या साहित्यिक वैभवात भर घालणारे ठरेल असा विश्वास व्यक्त करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या संमेलनाला सर्वोतोपरी पाठबळ दिले जाईल, असे […]

‘अमळनेरच्या साहित्य संमेलनाला सर्वोतोपरी पाठबळ देणार’

मुंबई, २७ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी : ‘साने गुरूजी यांचे शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जयंती वर्ष आहे. या निमित्ताने त्यांची कर्मभूमी असलेल्या अमळनेरमध्ये ९७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत आहे, याचा आनंद आहे. हे संमेलन खानदेशच्या साहित्यिक वैभवात भर घालणारे ठरेल असा विश्वास व्यक्त करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या संमेलनाला सर्वोतोपरी पाठबळ दिले जाईल, असे आश्वासन दिले.

संमेलनासाठी मुख्यमंत्री शिंदे यांना अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा प्रा. उषा तांबे, कार्याध्यक्षा प्रा.डॉ. उज्ज्वला मेहंदळ, संमेलनाचे समन्वयक प्रा.डॉ.नरेंद्र पाठक यांनी वर्षा शासकीय निवासस्थानी भेट घेऊन निमंत्रण दिले. याप्रसंगी बोलताना मुख्यमंत्र्यांनी संमेलनाला सर्वोतोपरी पाठबळ देण्याचे आश्वासन दिले.

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, ‘साने गुरुजींच्या कर्मभूमीत मराठी साहित्य संमेलन होत आहे, ही केवळ खानदेशसाठी नव्हे तर महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब आहे. या संमेलनातील विचार मंथनातून राज्यातील साहित्यिक चळवळीला दिशा मिळेल. ज्यातून राज्याच्या हिताच्या उपक्रमांनाही चालना देता येईल, असा विश्वास देखील मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. खानदेशला मोठी साहित्यिक परंपरा राहिली आहे. यामुळे हे संमेलन निश्चितपणे यशस्वी होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number