एसटीतही ई-पेमेंटला पसंती

ठाणे, २३ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी : उशिरा का होईना एसटी महामंडळाने प्रवाशांसाठी डिजिटल पेमेंटच्या माध्यमातून तिकीट काढण्याची सोय उपलब्ध केल्याने प्रवासात सुट्ट्या पैशांची चिंता दूर झाली आहे. शिवाय, एसटीच्या उत्पन्नामध्ये भर पडत आहे. प्रायोगिक तत्त्वावर १ नोव्हेंबरपासूनच डिजिटल पेमेंटचा वापर करण्यास सुरुवात झाली होती. य़ा माध्यमातून एसटीच्या ठाणे विभागाला गेल्या दीड महिन्यात नऊ लाखांपेक्षा जास्त […]

एसटीतही ई-पेमेंटला पसंती

ठाणे, २३ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी : उशिरा का होईना एसटी महामंडळाने प्रवाशांसाठी डिजिटल पेमेंटच्या माध्यमातून तिकीट काढण्याची सोय उपलब्ध केल्याने प्रवासात सुट्ट्या पैशांची चिंता दूर झाली आहे. शिवाय, एसटीच्या उत्पन्नामध्ये भर पडत आहे. प्रायोगिक तत्त्वावर १ नोव्हेंबरपासूनच डिजिटल पेमेंटचा वापर करण्यास सुरुवात झाली होती.

य़ा माध्यमातून एसटीच्या ठाणे विभागाला गेल्या दीड महिन्यात नऊ लाखांपेक्षा जास्त रुपयांचे उत्पन्न प्राप्त झाले आहे. आजघडीला डिजिटल पेमेंटच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर पैशांचे व्यवहार होत असून एखादी छोटी वस्तू खरेदी केली तरी नागरिक ऑनलानद्वारे पैसे देतात. डिजिटलमुळे रोखीने व्यवहार करणाऱ्यांची संख्या कमी झाली आहे. हीच गोष्ट लक्षात घेऊन एसटी महामंडळाने एक पाऊल पुढे टाकत डिजिटल प्रणालीद्वारे तिकीट खरेदी करण्याची सोय प्रवाशांसाठी उपलब्ध करून दिली.

अनेकदा सुट्ट्या पैशांवरून वाहक आणि प्रवाशांमध्ये वाद होतात. मात्र डिजिटल पेमेंटमुळे वाद होणार नाहीत. तसेच, सुट्ट्या पैशांची चिंताही प्रवाशांना राहणार नसून डिजिटल प्रणालीद्वारे प्रवाशांना तिकीट खरेदी करता येईल, यासाठी अँड्रॉइड तिकीट इश्यू मशिन्स एसटीच्या सेवेत आल्या आहेत. या मशिनमुळे प्रवासी रोख पैशांऐवजी यूपीआय, क्यूआर कोडचा वापर करून तिकीट काढत आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number