विगमधून ड्रग्जची तस्करी

मुंबई, २० डिसेंबर २०२३, प्रतिनिधी : ड्रग्जच्या तस्करीसाठी वेगवेगळे प्रयोग केले जातात. कोणी ड्रग्जच्या पिशव्या अथवा कॅप्सूल गिळून ते पोटातून तस्करी करून बाहेर नेतात अथवा गुप्तांगात लपवून नेतात. युगांडाच्या एका महिलेने तर तस्करीसाठी विगचा वापर केला. वीगमधून युगांडाची महिला आठ कोटी ९० लाख रुपयांचे ड्रग्ज विमानतळावरून बाहेर नेण्याच्या प्रयत्नात होती. पण मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावरील महसूल […]

विगमधून ड्रग्जची तस्करी

मुंबई, २० डिसेंबर २०२३, प्रतिनिधी : ड्रग्जच्या तस्करीसाठी वेगवेगळे प्रयोग केले जातात. कोणी ड्रग्जच्या पिशव्या अथवा कॅप्सूल गिळून ते पोटातून तस्करी करून बाहेर नेतात अथवा गुप्तांगात लपवून नेतात. युगांडाच्या एका महिलेने तर तस्करीसाठी विगचा वापर केला. वीगमधून युगांडाची महिला आठ कोटी ९० लाख रुपयांचे ड्रग्ज विमानतळावरून बाहेर नेण्याच्या प्रयत्नात होती. पण मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावरील महसूल गुप्तचर विभागाच्या अधिकाऱ्यांना महिलेच्या हालचालींचा संशय आला. संशय येताच महिलेला अडवण्यात आले आणि तिची तपासणी करण्यात आली. या तपासणीत विगमध्ये लपवलेले ड्रग्ज सापडले आणि सगळा प्रकार उघडकीस आला. यानंतर ड्रग्जच्या तस्करीप्रकरणी महिलेला अटक करण्यात आली. महिलेने विगमध्ये कोकेनच्या छोट्या प्लास्टिकच्या पिशव्या लपवल्या होत्या. या पिशव्यांमधून ८९० ग्रॅम कोकेन होते. न्यायालयाने ड्रग्ज प्रकरणी महिलेला न्यायालयीन कोठडी दिली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number